25.5 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeठळक बातम्या*इचलकरंजीत सूर्यवंशी दाम्पत्याचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार*

*इचलकरंजीत सूर्यवंशी दाम्पत्याचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार*

इचलकरंजी / दि.६ (प्रतिनिधी )– इचलकरंजी शहरातील मंगळवार पेठ येथील अमर सूर्यवंशी व सौ.शीतल सूर्यवंशी या सूर्यवंशी दाम्पत्यानेनुकतेच गावभागातील देसाई यांचे रस्त्यात सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट परत दिले होते. या प्रामाणिक कार्याबद्दल इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन, माजी नगरसेवक राहुल खंजिरे यांच्या हस्ते व भागातील प्रमुख नागरिकांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राहुल खंजिरे म्हणाले की,सौ.शीतल सूर्यवंशी यांनी रस्त्यात सापडलेले सोन्याचे ब्रेसलेट परत देऊन समाजामध्ये प्रामाणिकपणाचा पायंडा पाडला आहे. त्यांना या चांगल्या कामात साथ देण्यासाठी प्रोत्साहित करणारे त्यांचे पती श्
अमर सूर्यवंशी यांचे विशेष अभिनंदन केले. सूर्यवंशी दाम्पत्याच्या या कृतीमुळे माणुसकी अजून जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सूर्यवंशी दाम्पत्याचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सदरचे दाम्पत्य आपल्या प्रभागातील असल्याने ही विशेष अभिमानास्पद गोष्ट असल्याचे सांगितले.
यावेळी परिसरातील बाळासाहेब जाधव, संजय निकम, नन्हा उर्फ उत्तम जाधव, राजू कचरे, युवराज भोपळे, जयसिंग जाधव, सचिन सौंदलगे, शामा रेंदाळकर, दत्ता जाधव, दत्ता संकपाळ, केरबा रेंदाळकर, रामदास कौंदाडे, आकाश सरडे व महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]