22.9 C
Pune
Thursday, October 30, 2025
Homeमनोरंजन*उत्सुकता ‘सातव्या एनजीएफ राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार -२०२२ सन्मान सोहळ्याची!*

*उत्सुकता ‘सातव्या एनजीएफ राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार -२०२२ सन्मान सोहळ्याची!*


भारतभरातील अद्वितीय कर्तृत्व सिद्ध केलेल्या दिव्यांगाना प्रवेशिका अर्ज सदर करण्याचे आवाहन!!

मुंबई, २८ जून २०२२: (राम कोंडीलकर यांजकडून)

शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांकरिता त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी एक तपाहून अधिक काळ कार्यरत असलेली नूतन गुळगुळे फाउंडेशन (एनजीएफ) ही मुंबईतील सुप्रसिद्ध संस्था असून या संघटनेचा सातवा “राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार सोहळा” येत्या वर्षी नोव्हेंबर २०२२ रोजी दिमाखात साजरा होणार असून या सोहळ्यासाठी इच्छुकांनी आपली माहिती व प्रवेशिका सादर कराव्यात असे आवाहन नूतन गुळगुळे फाउंडेशनच्या अध्यक्षा नूतन यांनी केले आहे. यंदा ध्येयपूर्ती पुरस्काराचे सातवे वर्ष असून भारतातील विविध भाषा आणि संस्कृती असलेल्या अनेक राज्यांतील दिव्यांगांकडून नामांकनांसाठी प्रवेशिका मागविताना आम्हाला विशेष आनंद होत असल्याचे त्या म्हणाल्या.

अर्जदारांची मुलभूत पात्रता पुरस्काराच्या सर्व प्रवर्गांसाठी ग्राह्य धरण्यात येईल, अर्जदार व्यक्ती ही शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दिव्यांग असावी, त्यासोबतच त्यांनी काहीतरी अद्वितीय कर्तृत्व सिद्ध केलेले असावे, आपल्या कौशल्यांचा उत्तम वापर करून आपल्या व्यवसायात/जीवनात एखादी सर्वसाधारण व्यक्ती विचार करू शकणार नाही, असे काहीतरी अलौकिक सिद्ध केलेले असावे. अशी एखादी कामगिरी, ज्यामुळे इतरांच्या/ समाजाच्या कल्याणासाठी दिलेले भरीव योगदान पुरस्कार नामांकन मिळवण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.

वैयक्तिक श्रेणीतील पुरस्कार

वैयक्तिक पुरस्कार (५ वैयक्तिक श्रेणीतील पुरस्कार).
माय लेक पुरस्कार.
कौटुंबिक पुरस्कार (एकाच कुटुंबातील दोन /तीन सभासद दिव्यांग असतील ).
संस्था पुरस्कार ( सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था ).
जीवन गौरव पुरस्कार (६५ वय व अधिक).
मरणोत्तर पुरस्कार.
इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज नोंदणीकृत कार्यालयात ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत, त्यांच्या संपूर्ण माहितीसह (बायोडाटा / पूर्ण प्रोफाइल), श्रेणी / अपंगत्वाची टक्केवारी (अधिकृत प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत) एका पासपोर्ट आकाराच्या फोटोसह पेन ड्राईव्ह / सीडी / व्हिडिओ / छायाचित्रे (फक्त 4) खालील पत्यावर पाठवावी.
पत्ता : २/८, मार्गदर्शन सोसायटी, प्रोफ. न.स. फडके मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००६९ येथे किंवा nutangulgulefoundation@gmail.com या ईमेल लवकरात लवकर पाठवावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]