26.3 C
Pune
Monday, June 22, 2026
Home महत्त्वाच्या घडामोडी उदगीर किल्ल्याचा होणार कायापालट

उदगीर किल्ल्याचा होणार कायापालट

0
431

*ऐतिहासिक वारसा असलेल्या उदगीरच्या किल्याचा होणार कायापालट ; सुमारे ,५ कोटीचा निधी मंजूर : राज्यमंत्री संजय बनसोडे*

लातूर,-(उदगीर)- महाराष्ट्रातील ऐतिहासिक संदर्भ असलेला तसेच पानिपतच्या युद्ध पर्वाची साक्ष असलेल्या उदगीर किल्लाचे जतन व संवर्धन करण्यासाठी व हा वारसा जपण्यासाठी शासनाने सुमारे पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. यातून या ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्लाची दुरुस्ती तसेच परिसरातील विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे किल्याचा कायापालट होऊन पुढील काळात मराठवाड्यातील पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाईल. हा निधी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

अनेक दिवसांपासून उदगीर किल्ल्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती. उदगीर शहरातील पायाभूत विकास होत असताना या शहराला असलेले ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या शहरात असलेला किल्ला याचे संवर्धन व जतन आवश्यक होते त्यासाठी पाठपुरावा करून उदगीर किल्ल्याच्या संवर्धनासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यातून किल्याच्या वास्तुचे स्ट्रक्चरल आँडिट करून अहवाल तयार करणे, पुरातत्व संकेतानुसार उत्खनन करणे किल्याच्या तंटबंदीची झाडे झुडपे काढणे पडझड झालेल्या वास्तुच्या भिंतीची दुरूस्ती, पर्यटकांसाठी पार्किंगची व्यवस्था इ.स्मारकांच्या जतन दुरुस्तीची कामे समाविष्ट करण्यात आली आहेत

उदगीर शहराचा भौतिक विकास होत असताना शहराचा या निमित्ताने संस्कृतीत विकास होत आहे या किल्याच्या संवर्धनातुन येथील पर्यटनाचा विकास होणार आहे शहरातील पर्यटनच्या विकासातुन नवीन रोजगार निर्मिती होणार आहे उदगीर येथील किल्याच्या संवर्धनमुळे शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]