39 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeउद्योग*एंजल वनचा ‘द रायजिंग स्टार’ ही उपाधीने गौरव*

*एंजल वनचा ‘द रायजिंग स्टार’ ही उपाधीने गौरव*

मुंबई, २९ जून २०२२: फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कंपनीने नेक्स्ट ५००-फॉर्च्युन इंडिया या देशातील पुढील ५०० सर्वांत मोठ्या कंपन्यांच्या यादीत ‘द रायजिंग स्टार’ ही उपाधी प्राप्त केली आहे. एंजल वनचा यंदा क्रमवारीत १६०वा क्रमांक होता. २०२१ मधील ३६९व्या स्थानावरून कंपनी २०९ स्थान वर चढली आहे.

फॉर्च्युन इंडिया नेक्स्ट ५०० ही देशातील पुढील ५०० सर्वांत मोठ्या कंपन्यांची क्रमवारी आहे. आर्थिक आव्हानांच्या काळातही प्रचंड स्थितीस्थापकत्व दाखवणाऱ्या या कंपन्या आहेत. फॉर्च्युन इंडियामध्ये ५०० ते २००० कोटी रुपयांदरम्यान उत्पन्न असलेल्या ५०० कंपन्यांची यादी केली जाते. यात सेक्टरल स्टार्स व रायजिंग स्टार्स असे दोन विभाग असतात.

एंजल वन ही रायजिंग स्टार म्हणून वर्गीकरण केल्या जाणाऱ्या काही मोजक्या कंपन्यांमधील एक आहे. आपल्या क्षेत्रात वेगवान वाढ साध्य करणाऱ्या कंपन्यांचा यात समावेश होतो. गेल्या वर्षातील क्रमवारीच्या तुलनेत मोठी प्रगती साधणाऱ्या कंपन्यांनाही रायजिंग स्टार (उगवता तारा) म्हणून मान्यता दिली जाते.

एंजल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण गंगाधर म्हणाले, “कंपनीची क्रमवारीतील प्रगती ही आमच्या ग्राहककेंद्री दृष्टीकोनाचे फलीत आहे. आम्ही ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेतो. यामुळे आमची कार्यात्मक व आर्थिक अशा व्यवसायाच्या सर्व मापदंडांवर प्रगती झाली आहे. यूजर-फ्रेण्डली सोल्युशन्सच्या विकासाप्रती प्रयत्न आणखी पुढे नेण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आम्हाला या मान्यतेद्वारे मिळाली आहे.”

एंजल वनने अलीकडेच केवळ वर्षभराच्या काळात आपल्या ग्राहकांची संख्या दुप्पट करून १ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एआरक्यू प्राइम (रेकमेंडेशन इंजिन), स्मार्ट मनी (एज्युकेशन प्लॅटफॉर्म), स्मार्टएपीआय (ऑटोमेटेड ट्रेडिंग), आयट्रेड प्राइम (झिरो ब्रोकरेज) आणि व्हेस्टेड, स्मॉलकेस, स्ट्रीक व सेन्सीबुल यांसारखी थर्ड-पार्टी उत्पादने यांसारख्या सर्वोत्तम तंत्रज्ञान उत्पादनांच्या माध्यमातून या फिनटेक कंपनीने प्रचंड वाढ साध्य केली आहे.

एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी म्हणाले, “आम्ही गेल्या काही वर्षांत स्वीकारलेला दृष्टीकोन व धोरणे यांच्याखेरीज ही मान्यता मिळू शकली नसती. आमच्या वापरकर्त्यांना एक अखंडित अनुभव पुरवण्यासोबतच, आम्ही संपदासंचय सोल्युशन्स श्रेणी २, ३ व त्यापलीकडील शहरांमध्ये सर्वांना उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केले. आमचा वाढीचा पुढील टप्पा आमच्या सुपरअॅपवर आधारित आहे. हा एक प्रभावी वेब व मोबाइल प्लॅटफॉर्म असून, तो ग्राहकांना सर्वोच्च दर्जाचा अनुभव देईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]