24.1 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeआरोग्य वार्ता*एमजीएम रुग्णालयास मेडिकल व्हँन भेट*

*एमजीएम रुग्णालयास मेडिकल व्हँन भेट*

*एंड्रेस अँड हाऊझर समुहाच्या वतीने एमजीएम वैद्यकीय रुग्णालयास डायग्नोस्टिक मेडिकल व्हॅन भेट*

*२९ प्रकारच्या चाचणी करता येणार, ग्रामीण भागातील लोकांसाठी दोन्हीही संस्थांचा पुढाकार*

औरंगाबाद ; (प्रतिनिधी ) –

ऑटोमेशन आणि प्रयोगशाळांतील संसाधनांची निर्मिती करणारी आंतरराष्ट्रीय कंपनी एंड्रेस अँड हाऊझरच्या वतीने औरंगाबाद येथील एमजीएम वैद्यकीय रुग्णालयास अत्याधुनिक संसाधनांनी सुसज्ज डायग्नोस्टिक मेडिकल व्हॅन सोमवारी भेट देण्यात आली.

याप्रसंगी एंड्रेस अँड हाऊझर समुहाच्या पर्यवेक्षकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. क्लॉज एंड्रेस, एम्बेसेडर आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उर्स हर्बर्ट एंड्रेस आणि कंपनीचे २५ सदस्यीय शिष्टमंडळ तसेच महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ. पी.एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, जेएनईसीचे प्राचार्य डॉ. एच.एच.शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. एंड्रेस अँड हाऊझरचे व्यवस्थापकीय संचालक तसेच जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (जेएनईसी) इन्स्ट्रुमेशन इंजिनिअरिंग शाखेच्या 1992 च्या तुकडीचे विद्यार्थी असलेले कैलास देसाई यांच्या प्रयत्नातून हा पुढाकार घेण्यात आला होता. 

या वेळी कैलास देसाई म्हणाले, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयानी केलेली रुग्णसेवा आणि त्यामाध्यमातून या भागातील लोकांना उत्तम सुविधा देत अत्यंत कौतुकास्पद कार्य केले आहे. ग्रामीण भागातील लोकांना अत्यंत माफक दरात आणि योग्य सेवा देण्याच्या महात्मा गांधी मिशनच्या सेवाकार्यास आमचाही हातभार लागावा, यासाठी एंड्रेस अँड हाऊझर कंपनीने सामाजिक जबाबदारी उपक्रमातंर्गत (सीएसआर) डायग्नोस्टिक मेडिकल व्हॅन देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील लोकांना या माध्यमातून त्यांच्या ठिकाणी सर्व निदानात्मक सेवा मिळू शकतील. ज्या भागात प्रयोगशाळा नाहीत किंवा निदानात्मक सुविधा उपलब्ध नाहीत, अशा भागातील लोकांना या डायग्नोस्टिक मेडिकल व्हॅनच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या जातील. यामध्ये विविध चाचणींसाठी सॅम्पल घेणे, त्यावर प्रक्रिया करून तिथेच त्याचे रिपोर्ट देण्याची व्यवस्था असणार आहे. यात ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, हिमोग्लोबीन, यूरीन प्रोटीन, यूरिन शुगर, यूरिन पीएच, यूरिन बिलीरुबीन, वायडल अँटिजेंट्स, टायफॉईड, एचआयव्ही-१ आणि २, रॅपिड प्रेग्नंन्सी टेस्ट, सिफिल्स्, मलेरिया, ट्रॉप्निन, सिरम, काविळ, ईसीजी,  फेटल डॉप्लर तसेच कान, नाक आणि घशाशी संबंधीत विविध २९ प्रकारच्या चाचण्या केल्या जातील, अशी माहितीही कैलास देसाई यांनी दिली. 

महात्मा गांधी यांनी तळागाळातील प्रत्येकांचे अश्रू पुसण्याची भावना व्यक्त केली होती आणि महात्मा गांधी मिशन आपल्या विविध उपक्रमांमधून हे कार्य करत आहे. एंड्रेस अँड हाऊझर समुहाने देऊ केलेल्या या डायग्नोस्टिक व्हॅनच्या माध्यमातून या उपक्रमास अधिक बळ मिळेल, अशी भावना महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी या वेळी व्यक्त केली. दरम्यान, एंड्रेस अँड हाऊझरचे डॉ. क्लॉज एंड्रेस तसेच एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, डॉ. राजेंद्र बोहरा, डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. तर,  प्रा. सरफराज अली यांनी सुत्रसंचालन आणि डॉ. परमिंदर कौर यांनी आभार मानले. 

*एमजीएममध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली*

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महात्मा गांधी मिशन संस्थेच्या वतीने सोमवारी आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रसिद्ध लेखक प्राचार्य विश्वास पाटील यांनी ‘हुतात्मा गांधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. गांधी समजून घेण्यासाठी गांधी तंत्र आणि गांधी तत्व समजून घेणे गरजेचे असून गांधी विचार प्रत्यक्षात आत्मसात करणे आवश्यक आहे.  आजच्या काळातही गांधीजींच्या विचारांची  प्रासंगिकता आहे आणि आपण त्यानुसार कार्य करावे, अशी भावना विश्वास पाटील  यांनी व्यक्त केली. यावेळी महात्मा गांधी मिशनचे सचिव आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, गांधी अभ्यास विभाग प्रमुख डॉ.जॉन चेलादुराई  यांची उपस्थिती होती. याप्रसंगी गांधीजींच्या पुतळ्याला सुतमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गांधीजींना प्रिय असलेली ‘वैष्णव जन ते तेणे कहिये’ यासह काही भजने सादर करण्यात झाली. भक्ती बनवस्कर, राहुल खरे, संतोष धुमाळ, कृतांजली पाटील यांनी गायन तर हार्मोनिअमवर श्रीकांत गोसावी, तबल्यावर गजानन धुमाळ, बासरीवर सतीश जोगदंड आणि कीबोर्डवर  रुद्रम वेदपाठक यांनी साथ दिली. हुतात्मा  दिनानिमित्त दोन मिनिट मौन पळून कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ एच.एच. शिंदे, डॉ. रेखा शेळके, डॉ.प्राप्ती देशमुख, डॉ.अमृता राजपूत, प्रेरणा दळवी, डॉ.परमिंदर कौर,शिव कदम, बैजू पाटील, डॉ. बाळासाहेब सराटे, डॉ.आशा देशपांडे यांच्यासह  प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]