22.9 C
Pune
Sunday, June 22, 2025
Homeआरोग्य वार्ताऑर्थोपेडिक सप्ताह विविध उपक्रम

ऑर्थोपेडिक सप्ताह विविध उपक्रम

महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या वतीने 

ऑर्थोपेडिक सप्ताह उत्साहात साजरा 

लातूर : महाराष्ट्र ऑर्थोपेडिक दिवसाचे औचित्य साधून  महाराष्ट्र ऑर्थोपेडिक  असोसिएशन व लातूर ऑर्थोपेडिक असोसियशनच्या वतीने १ ते ७ मे  या दरम्यान ऑर्थोपेडिक सप्ताह साजरा  केला जात आहे. या निमित्त विविध आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

 दि. १ मे  हा महाराष्ट्र दिन तसेच महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचा स्थापना  दिवस म्हणून साजरा केला जातो.  या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संपत डुंबरे पाटील, सचिव डॉ. अभिजित वाहेगांवकर , लातूर ऑर्थोपेडिक असो.चे अध्यक्ष तथा महाराष्ट्र समन्वयक डॉ. अशोक पोद्दार, सचिव डॉ. संतोष माळी यांच्या  प्रमुख उपस्थितीत लातुरात विविध उपक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ३६ जिल्ह्यातही ३६ जिल्ह्यात समाजोपयोगी , डॉक्टरोपयोगी उपक्रम राबविले जातात. हे सर्व उपक्रम डॉ. पराग संचेती, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविले जातात. दि. १ मे  रोजी सकाळी दिशा प्रतिष्ठानच्या कार्यालयात वॉकर्स, रनर्स , सायकलिस्ट यांच्यासाठी आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिशा प्रतिष्ठानचे संचालक अभिजित देशमुख, मॅरेथॉन रनर डॉ. ब्रिजमोहन झंवर, सायकलिस्ट सुबोध सोमाणी उपस्थितीत  १७५ जणांची तपासणी केली गेली. त्यानंतर लातूर वृक्ष च्या संयुक्त विद्यमाने बाभळगाव रोड ते राजीव गांधी चौक या मार्गावर २५ ऑर्थो ट्रीची  लागवड करण्यात आली. त्यानंतर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकावू ऑर्थोपेडिक डॉक्टरांसाठी कार्यशाळा, एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कॅम्प , कार्यशाळा घेण्यात आली. 

 दि. १ मे  रोजी सकाळी ११ वाजता पोद्दार हॉस्पिटलमध्ये  ऑर्थोपेडिक आरोग्य शिबिराचे   उदघाटन  करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपाधीक्षक रणजित सावंत, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अभय कदम, वूमेन्स विंग अध्यक्षा डॉ. ज्योती सूळ यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते या शिबिराचे  उद्घाटन करण्यात आले.  यावेळीडॉ. दीपक गुगळे, डॉ. चेतन सारडा,  डॉ. अतुल उरगुंडे , डॉ. गिरीश कोरे, डॉ. राजकुमार दाताळ , डॉ. नितीन सास्तूरकर  यांसह  अनेक मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात एकूण ६९ रुग्णांची  तपासणी करण्यात आली. यामध्ये हाडांचा ठिसूळपणा, रक्त तपासणी, फिजिओथेरपी आदींचा समावेश होता. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आलेले हे १४८ वे आरोग्य शिबीर ठरले. रुग्णांना मोफत औषधीही उपलब्ध करून देण्यात आली. 

 त्यानंतर रात्री डॉक्टरांसाठी फिटनेस डायट बद्दल डायटिशियन  डॉ. दत्ता  आंबेकर, फिटनेस बद्दल  डॉ. आरती झंवर यांनी मार्गदर्शन केले.  , रवी गोडीया , आनंद राठी , ब्रोकरेज हाऊस  मुंबई यांनी इन्व्हेस्टमेंट , इव्हेन्ट मॅनेजमेंटबद्दल मार्गदर्शन केले.  स्व. डॉ. जगदीश अग्रोया, डॉ. रामेश्वर कांदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन्ही मेडिकल कॉलेजच्या पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  खा. डॉ. काळगे , गॅस्ट्रोलॉजिस्ट  डॉ. दीपक गुगळे, कार्डियोलॉजिस्ट  डॉ. शिवपुजे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास लातूरचे सर्व अस्थिरोग तज्ञ, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे दि. २ मे  रोजी  ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ज्येष्ठाना  हाडांच्या मजबुतीबाबत, फिटनेसबद्दल  मार्गदर्शन करण्यात आले.  हाडांचा ठिसूळपणाही  तपासण्यात आला. हाडांच्या मजबुती संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.  याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी वर्षा  ठाकूर – घुगे यांची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक सदस्य सहभागी झाले होते.

———————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]