सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराजांच्या पालखीचे उजनी येथे भव्य स्वागत
औसा;(विशेष प्रतिनिधी):–श्री सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज यांच्या माघ वारी पालखी दिंडी सोहळा आज बुधवारी दिनांक 21 रोजी उजनी येथील दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामासाठी पोहोचला पालखीचे औसेकर महाराजांचे आणि दिंडीचे उजनी ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात आले .
श्री बाबुराव गंगणे व इतरांनी ह भ प श्री ज्ञानराज गुरुबाबा महाराज औसेकर यांचे उजनी चौकातील उड्डाणपुलाजवळ शाल श्रीफळ अर्पण करून व आरती करून पालखीचे दिंडीचे उजनी करांच्यावतीने मनोभावे स्वागत केले श्री संत गणेश नाथाचा अभंग आळवून जयघोषात दिंडीराधानगरीत मुक्कामासाठी रवाना झाली उजनी उड्डाण पुलाजवळ राधानगरीकडे वळताना दिंडीचे प्रतिवर्षाप्रमाणे उजनीकरांनी उस्फुर्त असे स्वागत केले.यावेळी श्री बाबुराव गंगणे यांच्यासह श्री नारायणराव लोखंडे आबा ,श्री श्रीरंग वळके, श्री माणिकराव मुकडे ,श्री शिवाजीराव गंगणे व दिंडी पालखीच्या व्यवस्थापनातील प्रमुख भाविक ग्रामस्थ पालखीच्या व महाराजांच्या आगमन प्रसंगी उपस्थित होते .
यावेळी श्री गणेश नाथ महाराज यांचा नामघोष करीत ज्ञानोबा तुकाराम चा नामजप करीत दिंडी ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे मुक्कामासाठी रवाना झाली बेलकुंड येथे दुपार विश्रांती श्री ज्ञानराज महाराज यांचे चक्रीभजन संपन्न बुधवारी दिनांक 21 रोजी पहाटे 5 वाजता बोरफळ येथून पालखी दिंडीचे दुपार विश्रांती करिता बेलकुंड कडे प्रस्थान झाली सहा वाजता शिंदाळा पाटी येथे पालखीचे सिंदाळा ग्रामस्थांनी स्वागत केले .येथील भक्त ग्रामस्थांनी पहाटे तीन पासून गरम चहाची व्यवस्था केलेली होती. शिंदाळा येथे सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर ह भ प श्री ज्ञानराज महाराज यांचे स्वागत करताना श्री बाबासाहेब घोडके , शिवराज पाटील, प्रदीप पाटील ,संजय पोद्दार ,सखाराम पाटील, जितेंद्र पाटील, परमेश्वर लांडगे ,पितांबर मुळे आदी उपस्थित होते .चहापान व्यवस्थेचे हे चौथे वर्ष असून थंडी असूनही महिला व पुरुष भावीक दिंडीतील प्रत्येकाला चहा देण्यासाठी अगत्याने उभे असतात .बेलकुंड गावी साधारण आठ वाजता पालखी दिंडीचे स्वागत बेलकुंडकर ग्रामस्थांनी केले .येथील जिल्हा परिषद शाळेच्या भव्य प्रांगणात दिंडी आल्यानंतर परंपरेचे अभंग होऊन आरती संपन्न झाली व नंतर श्री ज्ञानराज महाराज औसेकर यांचे चक्रीभजन झाले.
यावेळी सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर व सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या दर्शनासाठी बेलकुंड ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. दिंडीतील उपस्थित भक्तासाठी विपुल अशी महाप्रसादाची सोय ग्रामस्थांनी केली होती. बुधवार रोजीचा दुसरा मुक्काम आटोपून गुरुवारी पालखी दिंडी पुढील मुक्कामासाठी केशेगाव कडे पहाटे पाच वाजता प्रस्थान ठेवणार असल्याचे श्री ज्ञानराज महाराज यांनी उजनी येथील राधानगरीत पालखी पोहोचल्यानंतर संपन्न झालेल्या महाआरती वेळी सांगितले .यावर्षी थंडीचा जोर अधिक असतानाही गतवर्षीपेक्षा सव्वा पटीने पायी चालत येणारे दिंडीतील भाविक यांची लक्षणीय उपस्थिती व उत्स्फूर्त सहभाग जाणवत आहे.




