33.4 C
Pune
Sunday, March 22, 2026
Homeराजकीय*कर्नाटक निवडणूक काॅंग्रेसच्या प्रचारकपदी शशांक बावचकर यांची निवड*

*कर्नाटक निवडणूक काॅंग्रेसच्या प्रचारकपदी शशांक बावचकर यांची निवड*

इचलकरंजी: प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून अनेक नेतेमंडळींसह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्‍यांची प्रचारक म्हणून निवड केली आहे. या यादीमध्ये इचलकरंजीचे माजी नगरसेवक तथा प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव शशांक मल्हारपंत बावचकर यांचा समावेश आहे.
सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून अनेक नेतेमंडळी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार आहेत. अशा स्टार प्रचारकांची यादी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचेकडून कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांना पाठविण्यात आली आहे. त्यामध्ये आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार हुसेन दलवाई, रमेश बागवे, सचिन सावंत, पृथ्वीराज पाटील आदींसोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव तथा इचलकरंजीचे माजी नगरसेवक शशांक बावचकर यांचा समावेश आहे. श्री. बावचकर हे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]