*गडकरींच्या सभेची जय्यत तयारी*

0
347

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सभा मंडप उभारणीचा शुभारंभ
कार्यक्रमाची जय्यत तयारी
लातूर/प्रतिनिधी ः- केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे गुरुवार दि. 25 नोव्हेंबर रोजी लातूर दौर्‍यावर येत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील दोन हजार कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामाचे भुमिपूजन व लोकार्पण सोहळा येथील टॉऊन हॉल मैदानावर पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या व ना. गडकरी यांच्या सभा मंडप उभारणीचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड व भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला.


विकासपुरुष म्हणून ओळख असलेले देशाचे रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दुरदृष्टीतून महाराष्ट्रासह देशभरात महामार्गाचे जाळे विणले जात आहे. हे महामार्ग विकासाचे महामार्ग ठरू लागलेले असून लातूर जिल्ह्यातही त्यांच्याच दुरदृष्टीतून महामार्ग होऊ लागलेले आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गुरुवार दि. 25 नोव्हेंबर रोजी लातूर दौर्‍यावर येत असून यानिमित्ताने त्यांच्या हस्ते दोन हजार कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टॉऊन हॉल) मैदानावर हा कार्यक्रम दुपारी 4.30 वाजता होणार आहे. हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरुपाचा होणार असून याकरीता सभा मंडप उभारण्यात येत आहे. या सभा मंडप उभारणीचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड व प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य शैलेश लाहोटी, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, जिल्हा सरचिटणीस किरण उटगे, जिल्हा ओबीसी सेलचे बापुराव राठोड, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. दिपक मठपती, मनपा गटनेते अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, परिवहन सभापती मंगेश बिरादार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश्वर चेवले, बाजार समितीचे संचालक विक्रम शिंदे आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरुपाचा व्हावा या दृष्टीकोनातून जिल्हाध्यक्ष आ. कराड व अरविंद पाटील निलंगेकर यांनी सुचना करून या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.
लातूर जिल्हा भाजपा कार्यकारणी बैठकीत मोदी सरकारचे अभिनंदन तर आघाडी सरकारचा निषेध; ना. गडकरी यांच्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन
लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची बैठक भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांच्या अध्यक्षतेखाली खा. सुधाकर शृंगारे प्रदेश भाजपाचे सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 23 नोव्हेंबर 2021 मंगळवार रोजी दुपारी 1 वाजता झाली या बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने केलेल्या विविध कल्याणकारी कामाची माहिती देऊन लोकसेवक म्हणून गेली वीस वर्ष काम करीत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बैठकीत अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला तर गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राला अराजकतेकडे ढकलणार्‍या शेतकरी विरोधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला
बैठकीचे प्रास्ताविक संघटन सरचिटणीस संजय दोरवे यांनी केले तर सरचिटणीस किरण उटगे यांनी विविध ठराव वाचून दाखविले त्यास उपस्थित भाजपा पदाधिकार्‍यांनी अनुमोदन दिले याप्रसंगी भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर आणि जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड खा. सुधाकर शृंगारे यांनी सविस्तर मार्गदर्शन करून 25 नोव्हेंबर रोजी लातूर येथे दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामाचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री मा नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते होत असल्याने आपण सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. या बैठकीस उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधीसह पदाधिकार्‍यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरुपाचा व्हावा या दृष्टीकोनातून प्रत्येकांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन करून कार्यक्रम लातूर पॅटर्नला शोभेसा व्हावा याकरीता परिश्रम घ्यावे अशी सुचना करण्यात आली.
या बैठकीस शैलेश लाहोटी दिलीपराव देशमुख, त्र्यंबक गुट्टे, शिवाजीराव केंद्रे. जयश्री पाटील, श्यामल कारामुंगे, जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, सभापती रोहिदास वाघमारे, गोविंद चिंलकुरे, शैलेश गोजमगुंडे, विक्रम शिंदे, अशोक केंद्रे, बापूराव राठोड, पंडित सूर्यवंशी, मीनाक्षी पाटील, उत्तरा कलबुर्गे, यांच्यासह भाजपाचे जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, आघाडी व मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सरचिटणीस, मंडळाचे अध्यक्ष व सरचिटणीस, जिल्हा परिषद – पंचायत समिती – नगरपालिका व नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी सदस्य आदी या बैठकीस उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here