लातूरच्या गायत्री हाॅस्पीटलला राष्ट्रीय मानांकन
जगात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवर मानांकन मिळवणे ही एक अभिमानाची बाब असते .वैदयकिय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील मानांकित संस्था म्हणजे एन ए बी एच (NABH) ही संस्था देशांतील हाॅस्पीटल चे काटेकोर पणे निरीक्षण करुन केंद्रीय संस्थेला गोपनीय अहवाल पाठवत असते .या मध्ये रुग्ण ,रुग्णालयातील ऊपचार पद्धती ,ऊपलब्ध अद्यावत यंत्रसामुग्री, ऊपलब्ध प्रशिक्षित कर्मचारी वर्ग ,ऊपलब्ध तज्ञ डाॅकटर्स ,वेळोवेळी राष्ट्रीय आपत्ती मध्ये केलेली रुग्ण सेवा विचारात घेतली जाते .बार्शी रोड वरील गायत्री हाॅसपीटल हे मागील पंधरा वर्षापासुन सर्व सामान्य रुग्णांना समोर ठेवून ऊपचार करत आलेले आहे .या रुग्णालयाचे नुकतेच राष्ट्रीय संस्थेने निरीक्षण केले होते असे प्रतिपादन प्रसिद्ध श्वसन विकार व छातीविकार तज्ञ डाॅ रमेश भराटे यांनी नमुद केले आहे. दिनांक ६/१०/२०२१ रोजी या संस्थेने ईमेल करुन गायत्री हाॅस्पीटल लातुर मानांकन दिले असल्याचे नमुद केले आहे .श्वसनविकार व छातीविकार रुग्णालय म्हणुन लातुर मध्ये मानांकन मिळवणारे हे रुग्णालय पहिलेच असावे .या बद्दल डाॅ भराटे व त्यांच्या चमुचे अभिनंदन करण्यात येत आहे.राष्ट्रीय मानांकन मिळाल्यामुळे आणखीन जिम्मेदारी वाढली असुन एक ऊत्कृष्ठ रुग्णालय म्हणुन सर्व जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचे डाॅ रमेश भराटे यांनी नमुद केले.या प्रसंगी लातुर येथील जिजाऊ ब्रिगेड व महिला मंडळ यांनी डाॅ भराटे यांचा सत्कार करुन अभिनंदन केले आहे.











