गुणवंतांचा पुण्यात सत्कार
पुणे. – जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानच्यावतीने आज पुण्यात पत्रकार भवन मध्ये यूपीएससी- एमपीएससीमधील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मला उपस्थित राहता आले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री मा.ना. विश्वजीत कदम साहेब, आमदार मोहन जोशी साहेब, वरिष्ठ पत्रकार मा.अशोक वानखेडे, इन्कम टॅक्सच्या मा. उपायुक्त क्रांती खोब्रागडे IRS उपस्थित होते.हा कार्यक्रम मुकेश धिवार यांनी आयोजित केला होता.

त्याचबरोबर ड्रीम फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने या कार्यक्रमानंतर ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतघुणकी यांनी गुणवंतांचा सत्कार सोलापुरी पगडी बांधून केला. त्यामध्ये कु.हेतल पगारे, कु.दीक्षा भवरे, अजिंक्य विद्यागर,डॉ. वैशाली यांचा समावेश होता.
दि.२३ ऑक्टोम्बर २०२१












