पर्वरी दि.१७:(प्रतिनिधी)
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी होतकरू युवकांना तसेच गरजू प्रौढांना जन शिक्षण संस्थान गोवा विविध कौशल्य प्रशिक्षण वर्ग आयोजित करून प्रशिक्षित करते. सरझोरा गावातील महिलांनी पंचायत प्रतिनिधींच्या मदतीने घेतलेल्या प्रशिक्षण वर्गातून प्रशिक्षित झालेल्यांनी महिलांनी स्वत:चे अस्तित्व जाणीवून देण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे विचार सरझोरा पंचायतीच्या सरपंच सबीता मास्कारन्हेस यांनी व्यक्त केले.

जन शिक्षण संस्थान गोवा आणि सरझोरा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार उद्दीष्टपूर्ती मेळावा, ग्राहक कल्याण जनजागृती तसेच मुद्रा लोन योजना शिबिर उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर पंचायत सचिव कृष्णा देसाई, कॅनरा बॅंक चे मंगेश टकले, जन शिक्षण संस्थान गोवा चे अधिकारी निमिषा पळ आणि निनाद वेळगेकर उपस्थित होते.

जन शिक्षण संस्थान गोवा तर्फे प्रशिक्षण घेऊन काम करणा-या महिलांची नियुक्ती पत्रे, स्वयंसहाय्य गटांची स्वउद्योग उभारणीची पत्रे देण्यात आली तसेच जन शिक्षण संस्थान गोवा तर्फे प्रशिक्षण पूर्णतेची प्रमाणपत्रे आणि स्वावलंबी झालेल्या लाभार्थींना प्रशंसापत्रे प्रदान करण्यात आली.
निमिषा पळ यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले की, जन शिक्षण संस्थान गोवा चर्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगाराभिमुख कौशल्ये शिकवून समाजातील आर्थिक संपन्नता वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे मार्गदर्शन केले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांनी अनुभव कथन केले. कृष्णा देसाई यांनी जन शिक्षण संस्थान गोवा चे कार्यक्रम अधिकारी निनाद वेळगेकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे हे पाहून आनंद होत आहे असे सांगितले.
निनाद वेळगेकर यांनी आभार मानले.