:13 जागा पैकी 7 जागेवर केला विजय संपादन :शेतकरी विकास पॅनलला 6 जागेवर मिळाले यश….
चापोली – येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे साठी आज सकाळी आठ वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया संपन्न झाली..
या मतदान प्रक्रियेनंतर लागलीच मतमोजणी करण्यात आली. यात 547 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 16 मते अवैध ठरवण्यात आली. या निवडणुकीत चापोली येथील नितीन कुलकर्णी,बसवराज गंगापूरे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या करण्यात आलेल्या परिवर्तन विकास पॅनलने 13 जागेपैकी एकूण 07 जागेवर यश संपादन केले असून तर विद्यमान चेअरमन बालाजी शेवाळे, माजी चेअरमन समीर देशमुख, माजी चेअरमन बालाजी शेवाळे, माजी चेअरमन त्र्यंबक गंगापूरे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या करण्यात आलेल्या शेतकरी विकास पॅनलचे 13 पैकी 06 जागेवर विजय मिळवला आहे.
चापोली च्या परिवर्तन विकास पॅनल ने बहुमत मिळवले आहे.
चापोली सोसायटीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :

कुलकर्णी नितीन -(276), गंगापूरे त्र्यंबक(275)
गंगापुरे बसवराज (268) देशमुख अलीमिया (251), देशमुख समीर (251), पाटील नंदकुमार(259), होनराव मारुती (261), होनराव शिवाजी (249), सुरणर त्र्यंबक (297),(होनराव) नवाडे संगीता (302), मद्दे मनीषा (254), कासले बालाजी (266), शेवाळे बालाजी -(286)…
सर्व विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या….