निलंगा तालुक्यातील 32 गावांत ” चूल बंद ” आंदोलन…
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- अतिवृृष्टी आणि पुरपरिस्थितीच्या अनुषंगाने शेतकर्यांचे खरीप हंगामातील पीकांचे अतोनात नुकसान झाल्याने त्यांच्या न्यायहक्कासाठी माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृृत्वाखाली लातूर येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या दुसर्या आणि तिसर्या दिवशी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निलंगा विधानसभा कार्यक्षेञातील 32 गावात 24 तास अन्नत्याग करीत ” चूल बंद ” आंदोलन करण्यात येत आहे.

शेतकर्यांच्या पीकाचे नुकसान मांजरा-तेरणा नदीकाठच्या भागात उभ्या पीकात पाणी शिरल्याने सोयाबीनचे पीक मातीसह वाहुन गेल्याने त्या त्या क्षेञात वास येत आहेत.शेतकर्यांच्या हाती तोंडाशी आलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.शेतकर्यांनी झालेल्या नुकसानीची आँनलाईन आणि आँफलाईन माहिती विमा कंपनीला 72 तासांच्या आत कळविणे बंधनकारक करण्यात आले होते.त्याच धर्तीवर शासनाने अतिवृृृष्टीग्रस्त शेतकर्यांना 72 तासांच्या आत सरसकट मदत जाहिर करून सदरील मदत ही शेतकरी बांधवांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्याची मागणी माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी करीत तिन दिवशीय अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला.तरी सरकारने कोणतीही दखल घेतली नसल्याने माजी पालकमंञी तथा आ.निलंगेकर यांनी शेतकर्यांसह 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरू केले.या आंदोलनाच्या दुसर्या आणि तिसर्या दिवशीही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निलंगा तालुक्यातील निटूर,शेंद,ढोबळेवाडी,बसपूर,शिरोळ,वांजरवाडा,गिरकचाळ,होसूर,शिरोळ,अंबुलगा{बु},नदीवाडी,हंचनाळ,येळणूर,लिंबाळा,यलमवाडी,सावरी,मानेजवळगा,तगरखेडा,औरादशहाजानी,धानोरा,बामणी,हाडगा,मसलगा,ताजपूर,माकणी,अनसरवाडा,वडगाव,तुपडी,खडकउमरगा,वडगाव,तुपडी,खडकउमरगा आदींसह गावांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत प्रत्येक गावांना एक दिवस 24 तास अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देऊन ” चुल बंद ” आंदोलन करुन पाठिंबा दिला.अनेक गावातील शेतकरी आपापल्या गावात चावडीवर,मंदिरावर 24 तास एका ठिकाणी बसून आंदोलन करत आहेत.तात्काळ या आंदोलनाची दखल घेतली नाही तर गावोगावी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी तिसर्या दिवशी जिल्हाभरातील शेतकर्यांनी येऊन आपल्या शेतातील नुकसान भरपाईच्या अनुषंगाने पाठिंबा म्हणून येण्याची विनंती त्यांनी केली आहे.











