कला सन्मान पुरस्काराने सचिन जगताप सन्मानित…
सोलापूर,-( प्रतिनिधी )-सोलापूरच्या कलानिर्मिती मध्ये मोशन फिल्म स्टूडिओचे चित्रपट दिग्दर्शक, एडिटर सचिन जगताप या कलाकाराला यंदाचा राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे..
कलाक्षेत्रातील आर्ट बिट्स पुणे या संस्थेच्या कला सन्मान पुरस्कारासाठी चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य, लोककला या सर्व विभागांसाठी राज्यातून यंदा 6 हजार कलाकारांनी प्रस्ताव सादर केले होते, सादर केलेल्या प्रस्तावातून 900 कलाकारांना नॉमिनेशन दिले होते, त्यातून पुन्हा फक्त 350 कलाकारांना वेगवेगळ्या विभागात पुरस्कार जाहीर झाले आहेत यामध्ये सचिन जगताप यांना त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येणार आहे..

पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल आणि Artist Apron असे राहील.
मोशन फिल्म स्टुडिओ च्या माध्यमातून ऑडिओ-व्हिडिओ एडिटिंग, चित्रपट संकलन, दिग्दर्शन, निर्मिती या सर्व आघाड्यांवर वर्ल्ड क्लास सर्विसेस देण्याचा त्यांचा कायमचा प्रयत्न असतो. आजवर यांनी अनेक चित्रपट, प्रबोधन पर माहितीपट, लघुपट, व्हिडिओ जाहिराती, सोशल मीडिया जाहिराती, ऑडिओ रेकॉर्डिंग यांची कामे केलेले आहे..यापूर्वीही सचिन जगताप यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले होते…समस्त सोलापूरकरांना कला सन्मान पुरस्कार प्राप्त सचिन यांचा अभिमान वाटत आहे.











