*अभियांत्रिक शिक्षणाच्या मदतीसाठी जानाई प्रतिष्ठानचा उपक्रम*
*लातूरात १७ रोजी ‘थेट तुमच्या घरात’ नाट्य प्रयोग*
*लातूर ;दि.६( माध्यम वृत्तसेवा ):– अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क संकलनास्तव श्री जानाई प्रतिष्ठान विद्यार्थी मंडळाच्या वतीने येत्या १७ ऑगस्ट रोजी लातूरात ‘ थेट तुमच्या घरातून ‘ या धमाल विनोदी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास २५ वर्षापासून अव्याहतपणे हे प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.*

‘वारसा संस्कृतीचा जाणीव कृतज्ञतेची’ हे ब्रीदवाक्य घेऊन मागील २५ वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमातून अभियांत्रिकी शिक्षण हा सामाजिक उपक्रम जानाई प्रतिष्ठान राबवीत आहे. आज पर्यंत २५ वर्षात कार्यक्रमांचे आयोजन केले गेले यातून जो निधी संकलित झाला यातून १४४ विद्यार्थ्यांनी आपले अभियांत्रिकी पदवी शिक्षण पूर्ण करून ते इंजिनिअर झाले आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निधी संकलनातून यावेळी ६ गरजू , हुशार , होतकरू विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क भरले जाणार आहे ; अशी माहिती जानाई सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ .संतोष देशपांडे यांनी दिली.

प्रसाद खांडेकर , नम्रता संभेराव, ओंकार राऊत, भक्ती देसाई ,भाग्यश्री मिलिंद यांच्या प्रमुख भूमिका असलेले ‘थेट तुमच्या घरातून’ या तुफान विनोदी नाटकासाठीचे निमंत्रण नुकतेच नाटकाचे प्रमुख प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव यांनी स्वीकारले आहे. जानाई प्रतिष्ठान विद्यार्थी मंडळांनी रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी दयानंद सभागृह येथे रात्री ८ वाजता महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील प्रसाद खांडेकर ,नम्रता संभेराव ,ओंकार राऊत ,भक्ती देसाई ,भाग्यश्री मिलिंद या कलाकारांचा सहभाग असलेले थेट तुमच्या घरातून हे विनोदी नाटक होणार आहे.
या नाटकाचे निमंत्रण देण्यासाठी जानाई सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. पी. व्ही. कुलकर्णी ,सचिव मनोज सप्तर्षी, श्याम देशपांडे ,जानाई विद्यार्थी मंडळाचे वैभवी पत्की, शार्दुल कुलकर्णी यांनी पुणे येथे जाऊन प्रसाद खांडेकर यांच्या नाटकातील कलाकारांची भेट घेऊन नाटकासाठीचे निमंत्रण दिले .त्यांनी १७ ऑगस्ट रोजी लातूरला जानाई प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी शिक्षण आर्थिक सहाय्यासाठी नाटक सादर करण्याचे निमंत्रण स्वीकारले.

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जानाई प्रतिष्ठानला मदत करण्यासाठी या नाटकाच्या प्रवेशिका घेऊन या सामाजिक कार्यात सहभागी होऊन गरजू ,हुशार व होतकरू विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिक शिक्षणास सहकार्य सहकार्य करावे, असे आवाहन जानाई सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष संतोष देशपांडे, पालक अतुल ठोंबरे, डॉ. विश्वास कुलकर्णी, संजय अयाचित डॉ.आरती संदीकर, डॉ. वैशाली टेकाळे, शिवाजी कांबळे, विजय चोळखणे, दिलीप रांदड ,नारायण झाटे, एस. एम.मठ, राजेश मित्तल ,प्रसाद उदगीरकर, महेश औरादे आदींनी केले आहे.




