जेष्ठ नागरिकांचा सत्कार

0
809

*जेष्ठ नागरिक हेच आपले खरे मार्गदर्शक – जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे*

*जागतिक जेष्ठ नागरीक दिनानिमित्त जिल्हा परिषदेत विविध क्षेत्रातील जेष्ठांचा सत्कार समारंभ 

लातूर: जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत विविध क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार कार्यक्रम लातूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात आज संपन्न झाला .या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला….

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले की जिल्हा परिषदेचे सद्यस्थितीत जेष्ठांसाठीचे 50 विरंगुळा केंद्र स्थापित असून, या केंद्रात जेष्ठ नागरीकांचे जीवन सुखकर, आनंददायी, आरोग्यवर्धक व तणावमुक्त करण्याचे प्रयत्न होत आहेत अशाच प्रकारचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढाकारातून लातूर जिल्ह्यात जेष्ठांसाठी 500 विरगुंळा केंद्राची निर्मीती करण्याचे जिल्हा परिषदेचे ध्येय आहे.तसेच जेष्ठ नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सदैव कटिबध्द असल्याचे सांगत जेष्ठांची आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असून तालूकास्तरावर शिबीराचे आयोजन करून जेष्ठांना त्यांच्या आवश्यकतेनूसार औषधोपचार व साधनांचा पुरवठाही करण्यात येणार असल्याचेही राहुल केंद्रे यांनी यावेळी सांगितले .

या जेष्ठांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमास लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनिल खमीतकर, ज्येष्ठ नागरिक संघ दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत डॉ. बी आर पाटील, ज्येष्ठ नागरिक महिला संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष तसेच लातूर जिल्ह्यातील पहिल्या महिला डॉ. माया कुलकर्णी, नारी प्रबोधन मंचच्या अध्यक्षा श्रीमती सुमती जगताप , ज्येष्ठ नागरिक संघ लातूरचे अध्यक्ष आर.बी.जोशी, मेजर व्ही.व्ही. पटवारी,मेजर सुभाष गोरे, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू उमाशंकर पाळणे ,ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक, जिल्ह्यातील 90 वर्षावरील ज्येष्ठ शेतकरी निवृत्ती पांचाळ तसेच अन्य विविध क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. जेष्ठ नागरीक संघ दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष डॉ.बी.आर.पाटील यांनी लातूर जिल्हा परिषदेने जे कर्मचारी आई वडीलांचे संगोपन करीत नाहीत अशा कर्मचा-यांच्या वेतनातून 30% रक्कम आईवडीलांना देण्याबाबत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल व जि.प.ने विरंगुळा केंद्रे निर्माण केल्याबद्दल जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांचा यथोचित सत्कार केला .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजू गायकवाड यांनी केले तर आभार जिल्हा समाजकल्याण सभापती सुनिल खमितकर यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here