25.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeसहकार*टवेन्टिवन शुगर्स लि. युनिट १तिसऱ्या गळीत हंगामासाठी सज्ज*

*टवेन्टिवन शुगर्स लि. युनिट १तिसऱ्या गळीत हंगामासाठी सज्ज*

तिसऱ्या गळीत हंगामासाठी सज्ज,

अदययावत तंत्रज्ञानाने उभारलेला टवेन्टिवन शुगर्स लि. युनीट १
तिसऱ्या गळीत हंगामासाठी सज्ज, बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न

लातूर प्रतिनिधी १७ आक्टोंबर २३ :
साखर उदयोगातील सर्वांत अदययावत तंत्रज्ञानाव्दारे उभारण्यात आलेल्या लातूर नजीकचा टवेन्टिवन शुगर्स लि. युनिट १, तिसऱ्या गळीत हंगामासाठी सज्ज झाला असून आज मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून या कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
लातूर नजीक मळवटी येथे उभारण्यात आलेल्या टवेन्टिवन शुगर्स लि. युनिट १, चे यापूर्वी दोन गळीत हंगाम अत्यंत यशस्वी ठरले आहेत. सन २०२३-२४ मध्ये होणाऱ्या तिसऱ्या गळीत हंगामासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज आहे. गळीत हंगाम लवकरच सुरू होत असून या अनुषंगाने मंगळवार दि-१७ ऑक्टोबर २०२३ रोजी बॉयलर अग्निप्रदीपन टवेन्टिवन शुगर्स लि. चे व्हा. चेअरमन श्री. विजय देशमुख, जनरल मॅनेजर श्री. संतोष बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्वेन्टी वन शुगर्सचे वर्क्स मॅनेजर श्री. सुभाष सुरवसे व सौ. सुरवसे उभयतांच्या हस्ते विधीवत पूजन करून करण्यात आले.
लातूर जिल्हया व नजीकच्या परीसरात अतिरीक्त ऊसाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी राज्याचे माजी वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कल्पकतेने साखर उदयोगातील अदययावत तंत्रज्ञानाचा वापर करून टवेन्टिवन शुगर्स लि. युनीट १ ची उभारणी करण्यात आली आहे. या कारखाना उभारणीमूळे सन २०२१-२२ या वर्षात लातूर जिल्हयात अतिरीक्त ठरलेल्या ऊसाचे गाळप करणे शक्य झाले होते. त्यामूळे लातूर जिल्हा व परीसरात शेतकऱ्यासाठी हा कारखाना अत्यंत फायदेशीर ठरला आहे.
लवकरच सुरू होणाऱ्या गळीत हंगामासाठी या कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली असून त्यासाठी सर्व विभागानी जय्यत तयारी केली आहे. कारखाना उभारणी नंतर सुरूवातीचे गळीत हंगाम असूनही ऊसउत्पादकांना कारखान्याने उसाला एफआरपी प्रमाणे ऊसबीले अदा केली आहेत. यावेळीही सर्व सभासद व ऊसउत्पादकांच्या उसाचे वेळेवर गाळप करण्यासाठी पूर्ण नियोजन करण्यात आले असून टवेन्टिवन शुगर्स लि. गाळप झालेल्या उसाला चांगला ऊसदर देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे.

टवेन्टिवन शुगर्स लि. बॉयलर अग्निप्रदीपन प्रसंगी खातेप्रमुख व विभाग प्रमुख सर्वश्री अनिल महेंद्रकर, गोविंद देशमुख, नितिन मोरे, प्रदीप सक्सेना, सागर मिसाळ, उदय गायकवाड, विजयकुमार पांचाळ यांच्यासह ट्वेन्टी वन शुगर्सचे अधिकारी व कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]