” टाळ सप्ताह ” म्हणजे
श्रावणमास अनुष्ठानातील
एक महत्वाची साधनाच ,
……………………………….
ह भ प श्री ज्ञानराज महाराज
………………………………
औसा;:-( अँड शामराव कुलकर्णी यांजकडून )- सद्गुरु वीरनाथ महाराजांनी अत्यंत कल्पकतेने व तळमळीने श्रावणमास तपोअनुष्ठानाची कृपा प्रासादिक उपासना दिली यात प्रपंच चक्रातून मुक्त करणारे चक्रीभजन श्रीकृष्ण जन्माष्टमी ची साधना गोवर्धन उत्सव सोहळा आणि सलग एक आठवडा नाथ मंदिरात अखंड टाळ सप्ताह सेवा असा नित्यनेम देऊन सद्भक्तांना भक्तीत एकरूप ठेवले असे प्रतिपादन ह भ प श्री ज्ञानराज महाराज यांनी केले आहे.
श्रावण आरंभापासून सायंकाळी नाथ मंदिरातील नित्य प्रासादिक चक्रीभजनानंतर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी वर निरूपण करताना महाराज बोलत होते. अठराव्या अध्यायातील नव्या श्लोकातील उभी क्रमांक ५,६,७,८, या ओव्यांवर श्री ज्ञानराज महाराज माऊली यांनी ज्ञानेश्वरीवर आपल्या मधुर वाणीतून अगदी रसाळ असे निरूपण करून महिनाभर नाथ मंदिरात नित्याने माळसेवेत असणाऱ्या सर्व सदभक्तांना विशेषतः तरुण नवीन भाविकांना प्रवचन
श्रवणाची गोडी निर्माण केली. साध्या सोप्या पण संतकथा आणि धर्मग्रंथातील संदर्भ देत त्यांनी सुंदर असे विवेचन मांडून श्रवणीय केले.

टाळाटाळी लोपला नाद, ब्रम्हानंदी मुरला छंद मुखाने म्हणा हो हरी गोविंद ..असा हा टाळ घेऊन नेमाची सेवेकरी नाथ मंदिरात एक आठवडा स्वयंभू विठ्ठलापुढे व सद्गुरूंच्या पावन समाधीपुढे विठ्ठल नाम घेत उभे आसतील.
पांडुरंगाची व सद्गुरूंची आरती करून टाळांचे पुजन करून ज्ञानराज महाराजांनी ज्ञानदेव तुकाराम जयघोषात हा टाळसप्ताह उभा केला.
संसारिक व परमार्थ यांच्या दृष्टीने सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत संत तर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवरू तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा , असे विठ्ठल भक्तीत सुख मानणारे तर भौतिक सुखाच्या लालसेने आयुष्यभर इच्छानाआवर न घालता लोभ मोहापोटी धावा धाव करणारी संसारीक होत.
शाश्वत आणि परमसुख देणारे नामस्मरण अनुष्ठान संतसेवा हीच खरी साधना आहे,जी आपल्याला आत्मिक आनंद समाधान देणारी आहे जीवन चक्रातून बाहेर काढणारीअसल्याचे महाराज म्हणतात.
मंगळवारी परंपरेची नाईकवाडे परिवारांची माळ होती तसेच सोलापूरच्या शोभाजी तपासे राजकुमार चव्हाण ,राजेंद्र चव्हाण वसंत महामुनी, श्री आप्पाबाबा महाराज व कलदेव लिंबाळा येथील सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी गुरुचरणी आपली माळ सेवा रुजू केली .




