30.1 C
Pune
Wednesday, March 25, 2026
Homeसांस्कृतिक*डाॅक्टर-जानाईश्री पुरस्कार- डाॅ.प्रकाश आनंदगांवकर यांना जाहीर*

*डाॅक्टर-जानाईश्री पुरस्कार- डाॅ.प्रकाश आनंदगांवकर यांना जाहीर*

गरीबांचा डाॅक्टर
● मोठ्या मनाचा दिलदार डाॅक्टर
● जनसामान्यांना आपले वाटणारे डाॅक्टर


जानाई प्रतिष्ठानचा १ जुलै डाॅक्टर डे उपक्रम

लातूर ; दि.(प्रतिनिधी )श्री जानाई प्रतिष्ठान लातूर या संस्थेच्या वतीने दिला जाणारा वर्षे २०२२ चा” डाॅक्टर जानाईश्री ” पुरस्कार माजलगांव येथील हजारो गरीब लोकांचे फॅमिली डाॅक्टर “डाॅ.प्रकाश आनंदगांवकर यांना त्यांच्या वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, अध्यत्मिक ,राजकीय, सहकार क्षेत्रातील नि:स्वार्थ सेवेबद्दल १ जुलै २०२२“ डाॅक्टर डे “ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

रू २५,०००/- रोख, मानपत्र, महावस्त्र, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवार दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता जानाई फंक्शन हाॅल लातूर येथे पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न होणार आहे. रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे प्रांत उपाध्यक्ष प्रा.डाॅ.रमेश जोशी सरांच्या हस्ते डाॅ.प्रकाश आनंदगांवकर यांना हा पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद लातूर मधील जेष्ठ वैद्य संवेदना सेरेब्रल पाल्सी प्रकल्पाचे अध्यक्ष डाॅ.राजेश पाटील भूषविणार आहेत,अशी माहिती श्री जानाई प्रतिष्ठानचे पालक अतुल ठोंबरे अध्यक्ष डाॅ.वैशाली टेकाळे,जानाई विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष समर्थ कुलकर्णी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]