मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त डॉ. सोमनाथ रोडे यांचे आज व्याख्यान
लातूर..स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रयराव शिवणगीकर सार्वजनिक वाचनालय लातूर च्यावतीने 74 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आज शुक्रवार दिनांक 17 रोजी सायंकाळी 7 वाजता इतिहासाचे गाढे अभ्यासक माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रयराव शिवणगीकर सार्वजनिक वाचनालयाची स्थापना लातूर येथे काही वर्षांपूर्वी करण्यात आली. गत दोन वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रमातून वाचनालयाची वाटचाल चालू आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा एक वाचनालयाचा मुख्य उत्सवापैकी एक असून या स्वातंत्र्य संग्रामात तन,मन,धन अर्पण करून वैचारिक शस्त्र व शास्त्रांनी मुखर लढा देत हौतात्म्य पत्करणारे स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रयराव शिवणगीकर यांच्या नावाने वाचनालयाची स्थापना करून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा आजच्या तरुणांसमोर मांडण्यासाठी दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम उज्ज्वल भारतास बोध देणारा एक जाज्वल्य इतिहास या विषयांवर डॉक्टर सोमनाथ रोडे यांचे व्याख्यान आज आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रयराव शिवणगीकर सार्वजनिक वाचनालयाच्या लिंक वर या व्याख्यानाला सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होणार आहे. या व्याख्यानाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन व्याख्यानमालेचे संयोजक प्रा. विनोद चव्हाण, वाचनालयाचे अध्यक्ष प्रवीण शिवणगीकर, सचिव जयकिरण परदेशी, उपाध्यक्ष मिलिंद शेटे, सहसचिव संदीप केंद्रे, कोषाध्यक्ष प्रकाश जकोटिया, विश्वस्त आशिदकुमार बनसोडे, योगेश कुलकर्णी, भगवंत देशपांडे, प्रेरणा शिवणगीकर, संतोष बेंबळकर आदींनी केले आहे.











