लातूर
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी पूर्व भागातील तहानलेल्या हजारो झाडांना पाणी देऊन तृप्त केले.ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या मार्फत माणिकराव सोनवणे चौक, गूळ मार्केट ते सम्राट चौक ते छत्रपती शाहू महाराज चौक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्वामी विवेकानंद चौक ते गरुड चौक पर्यत रस्ता दुतर्फा झाडे, दुभाजकातील सर्व झाडांना पाणी देऊन झाडे जगविण्यासाठी प्रयत्न केला.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरातील स्वच्छता करून, झाडांच्या कटिंग करून सर्व झाडांना पाणी दिले. माणिकराव सोनवणे पुतळा परिसर धुवून तेथे ग्रीन लातूर वृक्ष टीमने लावलेल्या सर्व झाडांना पाणी दिले. स्वामी विवेकानंद चौक पुतळा परिसरातील झाडांना टँकरद्वारे पाणी दिले. गरुड चौकावर लावलेल्या शोभिवंत झाडांना देखील पाणी देण्यात आले.वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, शहर स्वच्छता करिता अविरतपणे ९८५ दिवस पूर्ण करत आज तहानलेल्या झाडांना पाणी देऊन तृप्त करण्यात आले.ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, पद्माकर बागल, पूजा पाटील, विमल रेड्डी, तेजस मुंडे, भगवान जाभाडे, अभिषेक घाडगे, सिताराम कंजे, दयाराम सुडे, सुलेखा कारेपूरकर, आशा आयाचित, बळीराम दगडे, मोईझ मिर्झा, विजयकुमार कठारे, नागसेन कांबळे, अभिजित चिल्लरगे, आकाश चिल्लरगे यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सातत्यपूर्ण वृक्ष लागवड व वृक्ष जोपासना उपक्रमामुळे लातूर परिसराचे हरित आच्छादन वाढले असून शहराचा अंतर्गत भाग हरित दिसत आहे.




