“हर घर नर्सरी” या उपक्रमात ग्रीन लातूर वृक्ष टीमचा सक्रिय सहभाग
लातूर – देशभरातील वृक्षप्रेमीकडून वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्मिळ, अतिदुर्मिळ बिया संकलित करण्यात आल्या होत्या.यामध्ये राजस्थान ची ओरिजिनल शमी/खेजडी, आसाम मधून सीता अशोक, गुजरात मधून रोहितक, कुंकू, कोकणातून रिठा, खैर याबरोबरच हिंगोलीचे रामफळ बिया, विदर्भातील काटेसावर, श्वेत गुंजा, काळा धोत्रा, मध्यप्रदेश मधून मदनफळ, पांगारा, टेंटू, ऐन, शिवण, वरुण, दंती, बेहडा, आईन, वारस, लाजाळू, सर्पगंधा, बकुळ, मेहेदि, वाकेरी, सालबन, रासना, मुसळी कंद इत्यादी मागविलेल्या बियांचे रोपण करण्यात आले.

लागतील तेवढ्याच बिया मागवून सर्व बियांचे रोपण करण्यात आले.दुधाच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, नर्सरी पिशवीमध्ये या वियांचे रोपण करून त्यांना भरपूर पाणी देण्यात आहे.अंदाजे २००० रोपांची ही रोपवाटिका तयार करण्यात आली आहे.शासनाच्या हर घर नर्सरी या उपक्रमात ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या ५० सदस्यांनी प्रत्येकी ५० रोपे तयार करण्याची जवाबदारी घेतली आहे. रोपांची चांगली वाढ झाल्यावर योग्य वेळी, योग्य ठिकाणी ही रोपे लावण्यात येतील.यापूर्वीही ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून शहरात आयुर्वेदिक महत्व असलेली हजारो झाडे ठीक ठिकाणी लावण्यात आलेली आहेत.

या उपक्रमाकरिता ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, पदमाकर बागल, गणेश सुरवसे, अमोल बिराजदार, दयाराम, सुडे, राहुल माने, आकाश सावंत, सुलेखा कारेपूरकर, तुळसा राठोड, हर्षदा बाचेपल्लीकर, सिया लड्डा, प्रा. मीनाक्षी बोडगे, पूजा पाटील, बळीराम दगडे, अरविंद फड, पांडुरंग बोडके, मुकेश लाटे, नागसेन कांबळे, सिताराम कंजे, श्यामसुंदर चाटे सर, विशाल रेड्डी, गायत्री शिंदे यांनी सहभाग नोंदविला.शहरातील नागरिकांनी घरोघरी लहान लहान रोपवाटिका बनवून तिथे तयार होणारी झाडे योग्य वेळी योग्य ठिकाणी लावावी असे आवाहन डॉ. पवन लड्डा यांनी केले आहे.
.





