देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

0
322

दस-यापर्यंत सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत नाही दिली तर सरकारला झोपू देणार नाही… देवेंद्र फडणवीस  

संभाजीराव सरकारवर हल्ला करा आम्ही तुमच्या सोबत,

निलंगा/प्रतिनिधी सध्या पुरामुळे निलंगा तालुक्यातील मांजरा व तेरणा नदीकाठावरील व अनेक शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे संकट अस्मानी पेक्षा सुल्तानी संकट आहे त्यामुळे प्रशासनाने पाणी सोडण्याचे कसलेही नियोजन न करता मांजरा धरणातून अचानक पाणी सोडल्याने मोठे नुकसान झाले आहे.अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दस-यापर्यंत नुकसानभरपाई नाही दिली तर सरकारला झोपू देणार नाही असा इशारा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यानी दिला आहे.

मांजरा व तेरणा नदी ला अचानक पूर आल्याने हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके संपूर्णपणे नष्ट झाली आहेत, तसेत इतर भागातील पिके जास्त पावसाने गेली आहेत, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची गरज आहे. माञ राज्य सरकार शेतक-याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सरकारने जर दस-या पर्यंत मदतीची रक्कम तसेच विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही केली तर भाजपा मोठे आंदोलन उभारेल त्यासाठी संभाजीराव तुम्ही सरकारवर हल्यासाठी तयारी करा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहोत असे विधान विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील गौर व औराद शा.येथील येथे पुरग्रस्त भागाची पाहणी करताना केले.फडणवीस हे पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी औसा तालूक्यातील शिवणी तसेच निलंगा तालूक्यातील गौर व औराद शा.येथे आले होते.

यावेळी त्यांच्या सोबत विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, खा. सुधाकर श्रंगारे आ. संभाजीराव पाटील निलंगेकर , आ. रमेश अप्पा कराड , आ. अभिमन्यु पवार , भाजपा चे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर , सुनिल गायकवाड भाजपा जिल्हा अध्यक्ष गुरनाथ मग्गे , जिल्हा परीषद अध्यक्ष राहूल केंद्रे , उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके,गणेश हाके,भाजपा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, प.स.सभापती राधा बिराजदार,उपसभापती अंजली पाटील अदी उपस्थित होते.

गौर व औराद शा.येथे मांजरा व तेरणा नदीकाठावरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने त्यांच्या समोर आपल्या वेदना मांडल्या त्यावेळी शेतकऱ्यांना धीर देत फडणवीस यांनी सध्याची वेळ अत्यंत वाईट आहे या वाईट परस्थितीत आपण ऐकमेकांना सांभाळा आम्ही सरकार सी लढू व मदत द्याला भाग पाडू असे सांगून सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत पोटच पोरगं गेल्या सारखे दुःख पिके वाहून गेल्यामुळे झाले आहे. त्यामुळे दोन वर्षापासून विमा नाही की अनुदान नाही यामुळे शेतकरी संकटात आहे माञ तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिला व संभाजीराव तुम्ही शेतकरी हितासाठी सरकारवर हल्ला करायची तयारी करा आम्ही तुमच्या सोबत आहोत आपण लढू आणि शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देऊ असा शब्द दिला.

विमा कंपनीने ७२ तासाच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करणे बंधनकारक आहे.परंतु या सरकारने तसे न करता शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले नाहीत तसेच निवेदन देवून देखील सरकारने दखल घेतली नाही.येणाऱ्या घटस्थापने अगोदर सरसकट नुकसानभरपाई नाही दिली तर लातूरच्या छञपती शिवाजी चौकात आंदोलन करून जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढून आंदोलन करू असा इशारा आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सरकारला दिला आहे.

शिवपुत्र आग्रे व बाबुराव भंडारे या शेतकऱ्यांनी मांजरा व तेरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे शेतकरी सतत पूर परस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचा उल्लेख करून हाताला आलेले सोयाबीन पूराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहे. एका रात्रीत आस्मानी व मानव निर्मित संकटामुळे मोठे नुकसा झाले आहे. अल्पभुधारक शेतकऱ्यांना मदत देत असताना बहू भुधारकृ शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्राप्रमाणे मदत मिळाली पाहीजे. सध्या जनावरांना चारा नाही असलेला चारा वाहून गेला आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना भरपूर शेतकऱ्यांना मदत केली आता आमची दिवाळी गोड करण्यास शासनाला भाग पाडा अशा व्यथा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here