अंबुलगा जिल्हा परिषद गटात नऊ कोटी निधीच्या विकास कामाचे लोकार्पण..
केळगाव, जाजनुर, सावंनगीरा , बोटकुळ येथे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाले लोकार्पण
निलंगा,-( प्रतिनिधी)-
आपण दिलेल्या मतदान रुपी आशीर्वादामुळेच केंद्र सरकार, राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास निधी उपलब्ध करून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून गावांचा कायापालट केला जात आहे.यापुढे भरमसाठ निधी आणून अनेक गावांचा विकास करणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे.असे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर लोकार्पन प्रसंगी म्हणाले.

निलंगा तालुक्यातील केळगाव, येथील लमाण( बंजारा) तांडा वस्ती येथे समाज मंदिर, जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे,एस आर एफ माध्यमातून डांबरी रस्त्याचे, दलित वस्ती व इतर ठिकाणी सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच जाजनूर येथे एस आर एफ मधून लांबोटा पाटी जाजनुर रस्ता, नवीन वस्ती ते समशान भूमी पर्यंत रस्ता, शाळा नवीन बांधकाम,पानंद रस्ता गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता दलित वस्ती मध्ये सिमेंट रस्ता संस्कृती सभाग्रह तर सावंनगीरा येथे आमदार स्थानिक विकास निधीतून दलित वस्ती मध्ये समाज मंदिर, पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत पाच कोटी पेक्षा जास्त रकमेचे रस्ता बूट मौजे बोटकुळ येथे कॉंक्रीट रस्ता सभाग्रहअशा अंबुलगा जिल्हा परिषद मतदारसंघातील अंदाजे विविध ९ कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या विकास निधी कामाचे उदघाटन व लोकार्पण भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश सचिव अरविंद पाटील पाटील निलंगेकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके ,तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या सभापती सौ.राधा बिराजदार,जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, चेरमन दगडु सोळुंके,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मंमाळे, भाजपा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे,भाजपा निलंगा शहराध्यक्ष ,वीरभद्र स्वामी,जिल्हा परिषदेचे सदस्य,संतोष वाघमारे, पंचायत समिती सदस्य,हरिभाऊ काळे,,अप्पाराव सोळुंके,युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस,तानाजी बिरादार,युवा मोर्चा शहराध्यक्ष , गोविंद माडीबोने, युवराज पवार,प्रशांत पाटील,नागेश पाटील,अजित जाधव,अदी मान्यवर उपस्थित होते.