36.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्र*नवश्या गणपती चॅरिटेबल ट्रस्ट ठरतेय अनेकांसाठी आधारवड*

*नवश्या गणपती चॅरिटेबल ट्रस्ट ठरतेय अनेकांसाठी आधारवड*

फेरफटका

इचलकरंजी : प्रतिनिधी

धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देत वस्ञनगरीत संत मळा येथे नवश्या गणपती चॅरिटेबल ट्रस्टने समाजासमोर आदर्श कार्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे.या ट्रस्टने आजतागायत नैसर्गिक आपत्तीच्या काळाबरोबरच कोरोना काळात समाजातील गरजूंना मदतीचा हात देतानाच
गरीब ,गरजू अशा सुमारे ७० मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारुन शिक्षणाच्या सार्वञिकीकरणाला मोठा हातभार लावला आहे.नुकताच या ट्रस्टने नवश्या गणपतीचे सुसज्ज मंदिर उभारले असून याठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असल्याचा अनेक भाविकांचा अनुभव आहे.त्यामुळे या मंदिराचा नावलौकिक वाढू लागला असून सामाजिक कार्याचे देखील मोठे कौतुक होत आहे.

सध्या सार्वजनिक मंडळांकडून
विविध सण , उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांकडून गोळा करण्यात येणाऱ्या
लोकवर्गणीचा दुरुपयोग करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.माञ ,याला काही मंडळे अपवाद आहेत.वस्ननगरीतील संत मळा येथे नवश्या गणपती चौकातील नवश्या गणपती चॅरिटेबल ट्रस्टने गेल्या १३ वर्षात गणेशोत्सव , गणेश जयंतीचे औचित्य साधून अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेतले आहेत.यामध्ये उत्सवासाठी जमा होणा-या लोकवर्गणीचा सदुपयोग करण्यावर विशेष भर दिला आहे.त्यामुळे दरवर्षी समाजातील १० ते १५ गरीब , गरजू मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारुन ते अत्यंत कर्तव्यनिष्ठेने पार पाडत आहेत.

सुरुवातीपासूनच याठिकाणी गणेशोत्सव काळात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असल्याने साहजिकच या गणपतीला नवश्या गणपती या नावानेच सर्व नागरिक ओळखूलागले.आणि हीच ओळख आजतागायत कायम राहिली असून याठिकाणी आता छोटेसे देखणेमंदिर उभारण्यात आले आहे.तसेच नवश्या गणपती चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने शासकीय दरबारी नोंदणी करण्यात आली आहे.या ट्रस्टने केवळ धार्मिक कार्यापुरते मर्यादित न राहता लोकवर्गणीचा सदुपयोग करण्यावर भर देतानाच दिवाळी सणाच्या काळात गरीब कुटूंबांना मोफत फराळ वाटप ,कोरोना काळात अत्यंत गरीब कुटूंबांना जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप ,आयजीएम रुग्णालयास १० व्हेंटिलेटर भेट , प्रसृती झालेल्या मातांना खाऊ वाटप , नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर ,वृक्षारोपण ,गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याबरोबरच अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून विधायक कार्याचा आदर्श निर्माण केला आहे.विशेष म्हणजे या ट्रस्टने आजतागायत सुमारे ७० मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले आहे.त्यामुळे धार्मिक कार्यास सामाजिक कार्याची जोड देत सुरु असलेले हे कार्य समाज विकासात मोठे योगदान देणारे ठरत आहे ,याची जणू पोहचपावतीच आता या ट्रस्टच्या नवश्या गणपती मूर्तीवर वाढत असलेली भाविकांची अतूट श्रद्धा व कार्यावरील विश्वासाने मिळत आहे.नवश्या गणपती हा सर्व मनोकामना पूर्ण करणारा असल्याचा अनेक भाविकांचा अनुभव आहे.‌त्यामुळेच अनेक भाविक दरवर्षी याठिकाणी मनोकामना पूर्ण झाल्याने मूर्तीस विविध वस्तू ,श्रीफळ दान करतात.यामध्ये भाविकांनीमोठ्या मूर्तीस एक किलो चांदीचा हार ,लहान मूर्तीस दोन हार ,किरीट ,छञी ,ञिशूल ,मोषक अशा चांदीच्या वस्तू अर्पण करुन अतूट श्रध्देचे दर्शन घडवले आहे.अशा विधायक कार्यात ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सदस्य अत्यंत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत.


भविष्यात या ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक कार्याबरोबरच प्रबोधन व समाजोपयोगी उपक्रम राबवून नागरिकांचा आमच्या कार्यावरील विश्वास अधिक दृढ केला जाणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष उदय ञिपणकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]