23.9 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeसाहित्य*ना.धो.महानौर यांना मसापची श्रद्धांजली*

*ना.धो.महानौर यांना मसापची श्रद्धांजली*

ना.धों महानोर: नक्षत्राचे देणे लाभलेले कवी
डॉ.शेषराव मोहिते.

लातूर:- ( वृत्तसेवा) — मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरच्या वतीने दिवंगत कवी ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे दि.७ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता घेण्यात आली. या सभेला लातूर मधील कवी, लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व महानोर यांचे व्याही श्री संभाजीराव सूळ उपस्थित होते.


या सभेत बोलताना डॉ. शेषराव मोहिते म्हणाले की, ना. धों. महानोर मराठी भाषेतील प्रतिभा संपन्न कमी होते. बहिणाबाई चौधरींच्या नंतर अस्सल ग्रामीण व निसर्ग कविता त्यांची आहे.आमच्या पिढीची जडणघडण त्यांनी केली. पाच दशकापासून ते सातत्याने लिहीत होते. त्यांच्या कुटुंबात लेखनाचा वारसा नसतानाही ते कवी गीतकार लावणीकार कथाकार कादंबरीकार ललित लेखक व शेतीसंबंधीचे वैचारिक व ललित लेखन त्यांनी ताकदीने लिहिले आहे शेती मातीत आणि कायम साधेपणाने जगणारा हा कवी नक्षत्राचे देणे लाभलेला होता. महानोर यांनी या पाच दशकाच्या प्रवासात स्वतःमधील कवी कधीही मरू दिला नाही.

त्यांच्या कवितेमुळे महाराष्ट्रातील राज्यकर्ते, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक व समाजांनी प्रेम केले.संपूर्ण महाराष्ट्र एकीकडे व महानोर एकीकडे इतकी मोठी विशेषता त्यांच्या लेखनात होती. यावेळी ना.धों. महानोर यांचे व्याही श्री संभाजीराव सूळ यांनीही महानोरांच्या मुळे आमचा लौकिक झाला.समाजात आमची प्रतिष्ठा लाभली.ते माणूस म्हणून खूप श्रीमंत होते असे ते म्हणाले.
ना.धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण आली।

यावेळी रामराजे आत्राम, रामदास कांबळे, संजय घाडगे, नरसिंग इंगळे, रामकृष्ण बैले, प्रदीप कांबळे, वृषाली पाटील,उषा भोसले, प्रकाश घादगिने, जी.जी. कांबळे, मोहन कांबळे ,नयन राजमाने, विवेक सौताडेकर,महादेव ढमणे, धनराज भाऊ मदने,राजाभाऊ मदने, लक्ष्मण मदने,सुभाषराव लवटे, अशोक काळे, पत्रकार गंगाधर डिगोळे, दत्तात्रय परळकर रा व म पाटील आदी उपस्थित होते.या सर्वांनी कवी ना. धों. महानोरांच्या साहित्यिक प्रवासाला उजाळा दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महानोर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयद्रथ जाधव यांनी केले.तर सूत्रसंचालन डॉ.संभाजी पाटील तर आभार डॉ.दुष्यंत कटारे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]