लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती सहकार पॅनलचे 19 पैकी 18 उमेदवार निवडून आल्याने निटूर येथे पेठे वाटून आनंदोत्सव साजरा..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-निलंगा तालुक्यातील निटूर येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती सहकार पॅनलचे 19 पैकी 18 उमेदवारांनी विजय संपादन केल्याने माजी मंञी तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख,धिरज देशमुख आणि प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या उत्तम नियोजनामुळे ही निवडणूक जिंकता आल्याने निटूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये या यशाबद्दल पेठे वाटून आंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिनकर निटूरे यांनी बोलताना म्हणाले, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख,धिरज देशमुख आणि प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या उत्तम नियोजनामुळेच सहकार पॅनलचे 19 पैकी 18 उमेदवारांनी दणदणीत विजयीभव संपादन केल्याने आम्हाला हा आनंदोत्सव पेठे वाटून साजरा करण्याचा मोठा योग आल्याचे सांगितले.
याप्रसंगी,संचालक राजकुमार सोनी,सुर्यकांत निटूरे,संजय पाटील,दिलीप जाधव,शब्बीर शेख,राजकुमार ठोबळे,इस्माईल गस्ते,सचिव एम.बी.कांबळे,पांडूरंग नाईक,शिवाजी बाबर यांची उपस्थिती होती.











