सर्वांनी विकासासाठी अन्नदाता शेतकर्यांनी ऊर्जादाता बनावे-केंद्रीयमंञी नितीन गडकरी यांचे आवाहन..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- आपल्या जीवना आवश्यकतेमध्ये पेट्रोल,डिझेलला पर्याय केवळ इथेनाॅल आहे.आजघडीला देशासाठी 25 लाख कोटी खर्चून पेट्रोल,डिझेल आयात करावे लागते.आता परिवर्तनाची गरज आहे आणि मला खाञी आहे,आपल्या देशातला शेतकरी पर्याय देईल.आपल्याच जमिनीतून पिकणार्या शेती मालातून व इतर प्रयोगातून ते शक्य आहे.त्यासाठी नवीन तंञज्ञानाच्या मदतीने बांबूच्या शेतीसह इथेनाॅल निर्मिती करत दिवसेंदिवस होणारे बदल आत्मसात करावे.आजचा अन्नदाता उद्याचा ऊर्जादाता बनावा,अशी अपेक्षा केंद्रीयमंञी नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

खाजगी,सार्वजनिक भागीदारीतून उभारलेले देशातील पहिले फिनिक्स आयशर वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन आयडीटिआर सस्थेचे उद्गघाटन देशाचे रस्ते वाहतूक व महामार्गमंञी नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.यावेळी त्यांनी देशात 22 लाख चालकांची कमतरता असून या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून शेतकर्यांच्या मुलांना रोजगार मिळणार आहे.नवीन तंञज्ञानासह मिळणारे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.समाजासह चालकांचेही प्रबोधन होईल.शेतकर्यांनी काळानुसार बदलत्या पिकपाण्याचे नियोजन करावे लागेल.आता गव्हासह मका,तांदळापासून इथेनाॅल बनवू शकतो.तुम्ही सर्वांनी याकडे लक्ष दिले तर येणार्या काळात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाहीत.शेतकरी समृृध्द व संपन्न होतील.

तुम्हाला संधी आली त्याचे सोने करा..लोदग्यात उभारलेल्या प्रकल्पातून गाव,गरीब,मजुरांसह शेतकर्यांचे कल्याण होणार आहे.गावे समृध्द संपन्न होतील.बेरोजगारांना रोजगार मिळेल.यातून मराठवाड्यातील जनतेला प्रेरणा मिळेल.येणार्या काळात प्राथमिक शिक्षणाव्दारे याची माहिती देण्यात येणार आहे,असे केंद्रीयमंञी नितीन गडकरी म्हणाले.लोदगा येथे 50 लाख बांबूंचे रोप बनविले जातात.येत्या काळात 50 हजार मुलांना यातून रोजगार मिळेल,असे पाशा पटेल यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर व्ही.ई.कमर्शियल व्हेकलचे उपाध्यक्ष जे.पी.वर्मा,राज्यमंञी संजय बनयसोडे,खा.सुधाकर श्रृंगारे,खा.ओमराजे निंबाळकर,आ.अभिमन्यू पवार,आ.बाबासाहेब पाटील,आ.विक्रम काळे,आ.रमेश कराड,प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,अशोक शिंदे आदी जणांची उपस्थिती होती.


