निलंगा येथे छञपती शिवरायांचे उभारणार 11 हजार स्क्वेअर फुटाचे तैलचिञ-प्रदेश सचिव तथा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांची माहिती
कोविडच्या नियमावलीचे पालन करून शाश्वत जयंती साजरी करण्याचे आवाहन
निलंगा,-( प्रशांत साळूंके )-
निलंगा येथे छञपती शिवाजी महाराज यांची जयंती यंदाही कोविडच्या प्रभावाची दक्षता घेत उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 18 फेब्रुवारी रोजी 11 हजार स्क्वेअर फुटाचे जगातील सर्वात मोठे छञपती शिवाजी महाराजांच्या तैलचिञाचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश सचिव तथा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली.

शिवजयंतीनिमित्त शनिवारी येथील जिजाऊ सृष्टी येथे बैठक पार पडली.त्यावेळी ते अध्यक्षपदावरून ते बोलत होते.यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डाॅ.एस.एस.शिंदे,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,माजी नगराध्यक्ष डाॅ.वीरभद्र स्वामी,माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे,डाॅ.लालासाहेब देशमुख,अशोक शिंदे,दत्ता शाहीर,प्रल्हाद बाहेती,विनोद सोनवणे,शेषराव ममाळे,विनोद सोनवणे,अंबादास जाधव,कुमूद लोभे,डाॅ.प्रमोद हातागळे,डाॅ.किरण बाहेती,डाॅ.नितीन जाधव,माजी सभापती शरद पेठकर,ज्ञानेश्वर बरमदे,नसीम खतीब,प्रमोद कदम,पाशामियाँ आतार,शफी भंगारवाले,किशोर लंगोटे,प्रसाद मुळे,बंटी देशमुख,मुजीब सौदागर,नयन माने,अनिल जाधव,माजी सभापती पिंटू पाटील,माऊली भोसले,रवी फुलारी,सुमित ईनानी,अँड.जयंत देशपांडे,अँड.पिंपळे,आशिष अट्टल,सुनिल टोम्पे,हरिभाऊ टोम्पे आदी उपस्थित होते.

सूञसंचालन एम.एम.जाधव यांनी केले.आभार डाॅ.लालासाहेब देशमुख यांनी मानले.तसेच शिवजयंती घरा-घरात,मना-मनात याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या परिसरात स्वच्छता अभियान राबवावे,असे आवाहन शिवजयंती संयोजक समितीने केले.





