34 C
Pune
Tuesday, March 24, 2026
Homeठळक बातम्या*पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या लातूर जिल्हा निमंत्रकपदी संगमेश्वर जनगावे यांची नियुक्ती*

*पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या लातूर जिल्हा निमंत्रकपदी संगमेश्वर जनगावे यांची नियुक्ती*

मुंबई : पत्रकारांच्या विविध समस्या, त्यांच्यावर होणारे हल्ले या विरोधात परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती कार्य करते. या समितीच्या लातूर निमंत्रक पदी चाकूर येथील पत्रकार संगमेश्वर माधवराव जनगावे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज जाहीर केले आहे.
संगमेश्वर जनगावे यांनी त्यांच्या वीस वर्षाच्या पत्रकारितेतील कारकिर्दीत लोकमत, लोकसत्ता, सकाळ, भास्कर, संचार, तरुण भारत, यशवंत, भुकंप, लोकप्रभा, महायुद्ध, गुरुमंत्र, जय सियाराम, विकास धारा आदी वर्तमानपत्रात काम केले आहे. तर सद्याला दैनिक शुभ दिन चे लातूर जिल्हा प्रतिनिधी व साप्ताहिक चाकूर टाईम्स चे संपादक म्हणून काम करतात. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पत्रकारितेतील योगदानाबद्दल शासनाने व विविध संस्थांनी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.


“लातूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या, त्यांच्यावर होणारे हल्ले, खोटे गुन्हे याच्या विरोधात आपण आवाज उठवाल. पत्रकारांची एकजूट व संघटना वाढीसाठी कार्य कराल अशी अपेक्षा” एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केली आहे..
या निवडीबद्दल मराठी पत्रकार परिषदे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, अनिल वाघमारे, अनिल महाजन, महिला संघटक शोभा जयपूरकर आदींनी जनगावे यांचं अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]