30.4 C
Pune
Sunday, June 21, 2026
Home जनसंपर्क *पत्रकारिता पुरस्कार जाहीर*

*पत्रकारिता पुरस्कार जाहीर*

0
343

उदगीर तालुका पत्रकार संघाचे मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर
सुर्यप्रकाश धूत यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
उत्कृष्ठ वार्ता गटात- विजय चौधरी
प्रथम तर शोधवार्ता गटात – अविनाश मुडेगावकर
उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने अयोजित मराठवाडा स्तरिय पत्रकारिता पुरस्कार २०२०-२०२१ चे पुरस्कार ५ जानेवारी रोजी जाहीर केले असून दैनिक सिध्देश्वर समाचारचे संपादक सुर्यप्रकाश धूत यांनी वृत्तपत्र क्षैत्रात आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे व सचिव दयानंद बिरादार यांनी जाहीर केले.

उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गत बारा वर्षापासुन मराठवाडास्तरिय उत्कृष्ठ वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पुरस्काराचे आयोजन केले जात असुन पुरस्काराचे हे तेरावे वर्ष आहे. या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात


*उत्कृष्ठ वार्ता गट*

*प्रथम पुरस्कार*
दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे –खुलताबाद
जिल्हा औरंगाबाद येथील प्रतिनिधी विजय चौधरी यांच्या ‘ शेतमाल उद्योगासाठी टाटांना साकडे ‘ या बातमीस अर्जुन मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मान चिन्ह प्रमाणपत्र,व्दितीय पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे ढोकी जि.उस्मानाबादचे प्रतिनिधी सुरेश कदम यांना ‘ ऊसाचे क्षैत्र वाढले, अतिरिक्त ऊस प्रश्न भेडसावणार ‘या बातमीस अमोल निडवदे यांच्या वतीने जेष्ठ पत्रकार कै. नागनाथअण्णा निडवदे यांच्या स्मरणार्थ तीन हजार रुपये रोख सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र,दैनिक दिव्य मराठीचे उमरगा प्रतिनिधी प्रदीप भोसले यांच्या ‘आपत्तीत संधी शोधत धरली प्रगतीची कास ‘ या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्यावतीने तीन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह ,


, *तृतीय पुरस्कार* जळकोट जि.लातूर येथील दैनिक यशवंतचे प्रतिनिधी माधव होनराव यांच्या ‘ संगीता दामरे यांच्या यशाला मेहनतीची किनार,नौकर राहून पत्नीला शिकवले,पत्नी बनली सरकारी कर्मचारी’ या बातमीस पत्रकार दयानंद बिरादार यांच्यावतीने कै.नागनाथ बिरादार यांच्या स्मरणार्थ दोन हजार रुपये ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


*शोध वार्ता गट*
*प्रथम पुरस्कार*
दैनिक लोकमतचे अंबाजोगाई जि. बीड येथील प्रतिनिधी अविनाश मुडेगावकर यांच्या ‘जिवावर उदार होऊन ४००रु रोजाने करतात काम ‘ या बातमीस अर्जून मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रु रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र ,व्दितीय पुरस्कार दैनिक देशोन्नतीचे किनगाव ता.अहमदपूर जि.लातूर येथील प्रतिनीधी असलम शेख यांच्या ‘ शासकीय विश्राम गृहाची इमारत मृत अवस्थेत’ या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्यावतीने रोख तीन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह , सिल्लोड जि.औरंगाबाद येथील दैनिक पुढारीचे प्रतिनिधी राजू वैष्णव यांच्या ‘साठ गावानी कोरोनाला वेशीवर रोखले ‘ या बातमीस जेष्ठ संपादिका श्रीमती निर्मलाताई बांगे यांच्यावतीने कै.वसंतराव बांगे यांच्या स्मरणार्थ रोख तीन हजार रुपये ,स्मृती चिन्ह,व प्रमाणपत्र


*तृतिय पुरस्कार*
कंधार जि.नांदेड येथील दैनिक बहुरंगी वार्ताचे प्रतिनिधी राजेश कांबळे यांच्या ‘कोरोना रुग्णासाठी १०८ रुग्णवाहिका ठरतेय जीवनदायी’ या बातमीस पत्रकार प्रशांत अपसिंगेकर यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ रोख २ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.


परिक्षक म्हणून लातूर येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील ,राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्रा,शिवशंकर पटवारी लातूर व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्रा. डाॅ. बाळासाहेब दहीफळे यांनी काम पाहिले तर जेष्ठ पत्रकार अॅड एल. पी.उगीले,व्ही.एस.कुलकर्णी, प्रा.प्रविण जाहूरे,डाॅ.धनाजी कुमठेकर या निवड समितीने जीवन गौरव पुरस्काराची निवड केली आहे.


मान्यवरांच्या हस्ते लवकरच पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]