“मला अभिमान आहे माझी पत्नी परिचारिका/नर्स असल्याचा”
मी दोन तीन दिसांपूर्वी ‘लोकाशा’ या वृत्तपत्रात एक लेख वाचला, त्यात ‘परिचारिका’बद्दल खूप खालच्या पातळीवर जावून लिहिले आहे ; ते वाचून मला खूप दुःख झाले.त्या लेखामधून लेखकाला समाजापुढे काय सिद्ध करायचे आहे हे मला समजले नाही!
काही सडक्या विचारसरणीचे लोक समाजामध्ये विष पेरण्याचे काम करतात. एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला किंवा स्त्री अथवा परिचारिकांना कॅरेक्टरलेस कसा काय ठरवू शकतो? एक दोन स्त्रियांबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तर त्याचे खापर सगळ्याच स्त्रियांवर का लादले जाते.जी परिचारिका आपल्यासाठी अहोरात्र सेवा देते तिच्याबद्दल असे लिहिणे खूपच वेदनादायी आहे.
कोरोनारारख्या जागतिक महामारीमध्ये जी परिचारिका; जीला आपण “कोरोना वर्रियर” म्हणून संबोधले, तीच परिचारिका आपल्या जिवाची, कुटूंबाची पर्वा न करता तुमच्या -आमच्या माय बापाची, लेकरांची, नातेवाईकांची सेवा करत होती जेव्हा आपण घरात आरामात बसलो होतो. ही सेवा बजावताना कितीतरी नर्सेस ने आपला जीव गमावला आहे, ह्या पण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. भारताच्या पंतप्रधानापासून ते राज्याचा मुख्यमंत्र्यांपर्यंत परिचारिकांच्या कार्याचे कौतुक केले अशा परिचारिकांना दोष देणे अत्यंत चुकीचे आहे.केवळ कोरोणा जागतिक महामारीच नव्हे तर यांनी वर्षानुवर्षे निःस्वार्थ रुग्ण सेवा केली आहे.
समाजामध्ये स्त्रिया स्वतः च्या पायावर ठामपणे उभ्या असून नौकरी व संसार उत्कृष्टपणे सांभाळत आहेत. आपण या स्त्रियांना/परिचारिकांना प्रोत्साहित केले पाहिजे. तुम्हाला जर त्यांच्या बद्दल आदर जरी नसला तरी कमीत कमी त्यांचा आपमान तरी करू नका.
मी सुद्धा एका परिचारिकेचा / नर्स चा पती आहे. याचा मला अभिमान आहे.मी समाजात वावरताना खूप आनंदाने सांगतो माझी पत्नी नर्स/ परिचारिका आहे.
जी परिचारिका “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” म्हणून अहोरात्र काम करते तिच्या बद्दल वाईट बोलणे अथवा लिहिणे खपवून घेतले जाणार नाही.मी ” लोकाशा” या वृत्तपत्रातील “त्या” लेखाचा जाहीर निषेध करतो.
सिद्धार्थ सुरेश मस्के
7972744656
लातूर.











