23.9 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeजनसंपर्क*परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी*

*परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी*

चाकूर येथील राज्यस्तरीय पत्रकारांचा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या नियोजनाची केली परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी

चाकूर : मराठी पत्रकार परिषदेचा मेळावा, रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार व वसंत काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा फेब्रुवारीमध्ये लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे होत आहे. यानिमित्ताने मराठी पत्रकार परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी चाकूर येथील नियोजन पाहणी करून स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकारांचे राष्ट्रीय मेळावे व पुरस्कार वितरण सोहळे जाणीवपूर्वक ग्रामीण भागात घेतले जातात. यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील पाटण, पालघर, वडवणी, गंगाखेड आदी ठिकाणी हे सोहळे व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहेत.

यावर्षी चाकूर तालुका पत्रकार संघाच्या विनंतीवरून हा सोहळा चाकूर येथे घेण्याचे निश्चित झाले आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या सूचनेवरून परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी, लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप नागापूरकर यांनी चाकूर येथे भेट देऊन नियोजित कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. जागेच्या पाहणीसोबतच राहण्याची व्यवस्था, जाण्यायेण्याच्या सोयी सुविधा, परिसरातील पर्यटन स्थळे आदी बाबी जाणून घेतल्या. परिषदेची आचारसंहिता, नियमावली, ध्येय धोरणे याविषयीची माहिती स्थानिक पत्रकार बांधवाना दिली. यासोबतच त्यांच्या समस्या व अपेक्षित असलेली मदत यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सह सरचिटणीस संगमेश्वर जनगावे , चाकूर तालुका मराठी पञकार संघाचे अध्यक्ष सदाशिवराव मोरे पाटील, सचिव विकास स्वामी, संजय पाटील, सुशील वाघमारे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.


चाकूर दूरचा तालुका असला तरी येथे उत्तम व्यवस्था होऊ शकते याची खात्री शिष्टमंडळास झाली आहे. यासोबतच चाकूर येथील शिवालय, सत्यसाई मंदिर, वृंदावन अम्युजमेंट आणि वॉटर पार्क, सीमा सुरक्षा दलाचे सह्ययक प्रशिक्षण केंद्र, नऊ नाथांपैकी एक वडवळ नागनाथ येथील वटसिद्ध नागनाथ मंदिर व संजीवनी बेट, झरी नवकुंड येथील हेमाडपंथी सिद्धेश्वर नागनाथाचे मंदिर, हाळी खुर्द येथील नवसाला पावणारी जनमाता देवी, रोहिणा येथील निसर्गरम्य परिसरात असलेली आंबिका देवी, शेळगाव येथील निसर्गरम्य परिसरातील मल्लेश्वर मंदिर, कलकोटी चे बालाजी मंदिर, कडमुळी परिसरातील हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हकाणी बाबा / कैलास टेकडी असे अनेक धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटकांना भुरळ घालणारी प्रेक्षणीय स्थळे चाकूर तालुक्यात व लातूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे राज्यासह देशभरातून आलेल्या पत्रकार बांधवाना चाकूर येथील हा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे. पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता लक्षात घेऊन तारखेची घोषणा लवकरच करण्यात येईल. आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाची घोषणा पत्रकार (दर्पण) दिनाच्या पुर्व संध्येला गुरुवारी (दि.५ जानेवारी) करण्यात येणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]