पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

0
466

केशवराज मा.विद्यालयात

*पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा*  

लातूर – दि.६सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने येथील श्री केशवराज मा.विद्यालयात आॅनलाईन पध्दतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न झाली.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी *पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा* आयोजित करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी स्वतःहून गणेश मूर्ती तयार करत होते. विद्यार्थ्यांना कलागुणांची आवड निर्माण व्हावी व पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी केशवराज माध्यमिक विद्यालयातील कलोपासक मंडळाच्या वतीने प्रयत्न होत असतात. गणेश मूर्ती तयार करायची आहे यासाठी विद्यार्थी गणेश उत्सवाची वाट पहात होते. तयार केलेल्या गणेश मूर्तींची गणेशोत्सव काळात सजावट करून प्रत्येक घराघरात स्थापना करावी असे आवाहन करण्यात आले.

या कार्यशाळेस मुख्याध्यापक मा.श्री सुनील वसमतकर, उपमुख्याध्यापक मा.श्री बालासाहेब केंद्रे, पर्यवेक्षक मा.श्री संजय कुलकर्णी,मा.श्री श्री संदीप देशमुख, यांनी शुभेच्छा दिल्या. पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन्ही विभागात स्वतंत्र आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कलाध्यापक श्री राम जोशी, श्री व्यंकटेश माने व कलाप्रेमी शिक्षक संदिप पाटील, संतोष बीडकर यांनी सहभाग घेतला.कलाध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here