पाच वर्षात नगरपालिकेने भरले पावणेबारा कोटी रूपये पाणी पुरवठ्याचे बिल
एकही बिल थकबाकीत पडू दिले नसल्यामुळे सुरळीत पाणी पुरवठा
निलंगा/प्रतिनिधी
निलंगा नगरपालीकेकडून डिसेंबर २०१६ पासून मागील पाच वर्षात पाणीपूरवठा योजनेचे एकही बील थकबाकीत पडू न देता आकरा कोटी ७७ लाख रूपये विजबीलाचा भरणा केला असून थकबाकीतीलही रकमेपैकी एक कोटी ४२ लाख रूपयाचाही भरणा केला आहे. त्यामुळेच शहरातील नागरिकांना पाण्याचा मुबलक व सुरळीत पाणीपूरवठा झाला.
येथील नगरपालीका ही ‘क’ वर्ग दर्जाची असतानाही माकणी ता. लोहारा येथील प्रकल्पातून आणलेली निलंगा शहरासाठीची सुधारित पाणीपूरवठा योजना परवडणारी नाही. शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये व नागरिकांना चोविस तास मुबलक पाणी मिळावे म्हणून माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विशेष प्रयत्नातून ८४ कोटी रूपयाची पाणीपूरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. सध्या नगरपालीकेवर प्रशासक असून सन २०१६ मध्ये माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली थेट नगराध्यक्षासह एकहाती सत्ता नागरिकांनी दिली होती. डिसेंबर २०१६ मध्ये केवळ पाणीपूरवठा योजनेची पाच कोटी १४ लाख रूपये एकूण थकबाकी होती त्यापैकी ८२ लाख रूपयाचा भरणा केला होता. फेब्रुवारी २०२१ अखेर चार कोटी ३२ लाख रूपये थकबाकी होती त्यातील थकबाकी पैकी ६० लाख रूपयाचा भरणा नगरपालीकेने केला आहे. तर चालू बिल एकही थकबाकीत पडू न देता आतापर्यंत दहा कोटी ३५ रूपयाचा भरणा केला असून चालू व थकबाकीतील विजबील मिळून आकरा कोटी ७७ लाख रूपयाचा भरणा केला आहे. त्यामुळेच शहरातील नागरिकांना विना अडथळा पाणीपूरवठा सेवा सुरळीतपणे देता आली. नगरपालीकेने पाणीपूरवठा योजनेचे मागील थकबाकी व चालू वेळेवर व सुरळीतपणे भरली नसती तर थकबाकीची रक्कम पंधरा कोटीच्या घरात गेली असती. चालू विजबीलाचा भरणा तर केलाच शिवाय मागील थकबाकी भरून एक वेगळा उपक्रम पाडला आहे.

शिवाय नवीन कार्यान्वित झालेल्या पाणीपूरवठा योजना मोठी असल्याने पूर्वीच्या विद्युत भार वरती ही योजना सुरळीतपणे चालणे अवघड होते. त्यामुळे विद्युत भार वाढवून घेण्यासाठी मागील चालू बिल भरणे अनिवार्य होते. त्यामुळे ही पूर्ण बाकी भरल्यानंतरच विज कंपनीने पाणीपूरवठा योजनेसाठीचा भार वाढवून दिला आहे. त्यामुळेच निलंगा शहरातील नागरिकांना २४ तास मुबलक पाणी मिळत आहे. सध्या शहरातील पाणीपूरवठा विजबीलावरून भाजपा व महाविकास आघाडीतील नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी नगरपालीकेतील वस्तूस्थिती अशी आहे.
……..
बाळासाहेब शिंगाडे : माजी नगराध्यक्ष
…….
निलंगा शहरातील पाणीपूरवठा योजनेची
जुनी थकबाकी भरण्यासाठी तत्कालीन भाजपा सरकारने व्याज माफ केले होते व थकबाकी असलेल्या रकमा भरण्यासाठी हप्ते पाडून दिले होते. त्यामुळे माझ्या कार्यकाळात पाणीपूरवठा योजनेसाठी आलेल्या चालू बिलाच्या रकमा तर भरल्या आहेत. मात्र जवळपास ८० टक्के थकीत रकमेचा भरणा केला आहे.
मुख्याधिकारी नगरपरिषद सुंदर बोंदर…
प्रशासक लागल्यापासून निलंगा नगरपालिकेचे दोन महिन्याचे पाणी पुरवठ्याचे विजबिल थकीत आहे.तसेच मागीलही काही बाकी आहे.यामुळे विजजोडणी तोडली होती परंतु म्हणावे तशी थकबाकी नाही आतापर्यंत बारा कोटी रक्कम भरणा केली आहे असे न.प.मुख्यधिकारी सुंदर बोंदर यानी सांगितले.