28.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*पाशा पटेल यांचे बांबु मधील काम देशाला दिशादर्शक*

*पाशा पटेल यांचे बांबु मधील काम देशाला दिशादर्शक*

नागेंद्रनाथ सिन्हा (केंद्रीय ग्रामविकास सचिव)

 लातूर दि.२३( प्रतिनिधी) पाशा पटेल यांनी बांबु लागवडी पासुन बांबुच्या वस्तु तयार करण्यासाठी उभे केलेले काम हे संपूर्ण देशाला मार्गदर्शक आहे असे गौरवोद्गार भारत सरकारच्या ग्रामविकास विभागाचे सचिव नागेंद्रनाथ सिन्हा यांनी लोदगा येथील बांबु प्रकल्पाला भेट दिल्या नंतर काढले.

भारत सरकारच्या ग्रामविकास विभागाचे सचिव नागेंद्रनाथ सिन्हा यांनी दि.२२ रोजी पाशा पाटील यांनी लोदगा येथे उभारलेल्या बांबु प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी बांबु टिश्यु कल्चर लॅब , रोपवाटिका यासह बांबु फर्निचर निर्मिती प्रकल्पाची पाहणी करुन माहिती घेतली. फर्निचर कारखान्यात सीनसी मशीनसह सर्व कामे महिला करत असल्याचे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी संजीव करपे यांनी त्यांना प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती दिली.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत कलाम कृषी शेतकरी उत्पादक कंपनीच्या या देशातील पहील्या बांबु उत्पादन प्रकल्पास महाराष्ट्र बॅंकेने दिलेल्या अर्थसहाय्यातुन उभारलेल्या या प्रकल्पात बांबुच्या अनेक वस्तु तयार केल्या जातात.या वस्तुंची पाहाणी पण त्यांनी केली.

 त्यांनतर फाउंडेशन फॉर एमएसएमई क्लस्टरचे मुकेश गुलाटी यांनी युरोपीयन युनियन च्या माध्यमातून देशात सुरु असलेल्या बांबु क्लस्टर बाबत सादरीकरण करुन बांबु उद्योगातील संधी व अडचणी बाबत माहिती दिली. मराठवाड्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपायुक्त सुरेश बेदमुथा, मुख्यकार्यकारी अभिनव गोयल यांनी ही सादरीकरण केले. या वेळी मराठवाडा,तेलंगाणा कर्नाटक या भागातुन आलेल्या बांबु उत्पादक शेतकऱ्यांनी बांबु लागवडीसाठी येणाऱ्या समस्या सचिव नागेंद्रनाथ सिन्हा यांच्या समोर मांडल्या यात प्रामुख्याने बांबु मधील अंतर ,अंतर पीक , रोजगार हमी योजनेच्या त्रुटी दुर करण्यासाठी मागणी केली. त्यानंतर बोलतांना पाशा पटेल यांनी बांबु लागवडी पासुन बांबुच्या वस्तु तयार करुन विक्री व्यवस्था उभारणी पर्यंत केलेले काम हे देशासाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले व या कामासाठी भारत सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे सांगितले. बांबु लागवडी पासुन बांबुच्या वस्तु निर्मीती पर्यंत बांबु मध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता असुन तीचा पुर्ण वापर पाशा पाटील करत आहेत . ग्राम विकास मंत्रालयाच्या माध्यमातून अशा प्रकारचे काम देशभर उभारण्यात येईल.त्यासाठी पाशा पटेल यांनी मार्गदर्शन करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त करत . शेतकऱ्यांच्या बांधावर कुंपण म्हणुन बांबु लागवडीसाठी मनरेगा योजनेतुन प्रोत्साहन देऊन यात बांबु उत्पादक शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या अडचणी दुर करण्यासाठी तातडीने कारवाई अरु असे ही ते म्हणाले. 

या वेळी बांबु प्रकल्पाचे पाशा पटेल लातुर चे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.लातुर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अभिनव गोयल, परभणीचे मुख्याधिकारी शिवानंद टाकसाळे,बीड चे मुख्याधिकारी अजित पवार, विभागीय उपायुक्त सुरेश बेदमुथा,लातुर महानगरपालिकेचे अमन मित्तल , मा.आ.अमरनाथ पाटील,शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदु,तेलंगाणा रयत संघाचे सुगणाकर राव, कर्नाटक रयत संघाचे, चंद्रशेखर जमखंडे,बसवकल्याण येथील डॉ मठपती,शुक्ला,अच्युत ग़गणे परभणी येथील रमेश माने,गणेश पाटील यांच्या सह तेलंगणा,कर्नाटक यांच्या सह महाराष्ट्रातील बांबु उत्पादक शेतकरी व मराठवाड्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी सर्व मान्यवरांचा बांबुचे कपडे व रोप देऊन स्वागत करण्यात आले. लोदगा येथील राजकुमार गोमारे यांनी आपल्या व्यवसायासाठी लागणारे फर्निचर बांबु पासुन तयार केलेले घेतले त्यांना सिन्हा यांच्या हस्ते खुर्ची देण्यात आले. फिनिक्स फाऊंडेशन चे परवेज पटेल व अमन पटेल व लोदगा येथील ग्रामस्थांच्या वतीन सरपंच पांडुरंग गोमारे यांनी नागेंद्रनाथ सिन्हा यांचे बांबुच्या वस्तु देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमासाठी फिनिक्स फाउंडेशन च्या अधिकारी कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.


फोटो :- लोदगा येथील बांबु प्रकल्पाला केंद्रीय ग्रामविकास सचिव नागेंद्रनाथ सिन्हा यांनी भेट दिली त्यावेळी माहिती देतांना पाशा पटेल व उपस्थित मान्यवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]