पीक नुकसानीची पाहणी

0
311

काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्याकडून मांजरा नदीकाठच्या पीक नुकसानीची पाहणी…

सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईसाठी आपण शासन दरबारी मदत मिळवून देणार…

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-निलंगा तालुक्यातील मांजरा नदीकाठच्या धरणाजवळील गांवकर्‍यांच्या सर्व शेतकर्‍यांच्या शेतात पाणी घुसल्याने त्या सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी बांधावर जाऊन करण्यात आली तसेच मांजरा नदीकाठच्या धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदीपाञातील पाणी शेतकर्‍यांच्या शेतात शिरल्याने उभे सोयाबीनचे व अन्य पीके पाण्याखाली असल्याने त्याची पाहणी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा,शिरूरअनंतपाळ तालुक्यातील मांजरा नदीकाच्या गावांना भेटी देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधून आपण शासन दरबारी मदत करण्याचे पाहणी दरम्यान सांगितले.

मागील आठवड्यापासून सतत पाऊस पडत असलेल्या पावसामुळे मांजरा व तेरणा विसर्ग करण्यात येत असल्याने निलंगा तालुक्यातून वाहणार्‍या दोन्ही नदीच्या काठावरील शेतात पुरस्थिती निर्माण झाल्याने पाणी शेतात घुसले आहे.सोयाबीनसह ऊसाचे पीक पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांमध्ये मोठी ओरड निर्माण झाल्याने काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यानी नुकसान स्पाॅटवर रविवारी मांजरा नदीकाठच्या ढोबळेवाडी,निटूर,उजेड,बाकली,बसपूर,राणी अंकुलगा आदी गावांतील पूरपरिस्थितीची पाहणी करून पीकाचे झालेले नुकसानुबद्दल माहिती घेत शेतकर्‍यांशी संवाद साधला.

नुकसानीबाबत प्रशासनाला पंचनामे करावयास सांगून शासनदरबारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.त्याचबरोबर नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत वीमा कंपनीला कळवावे,असेही आवाहन त्यांनी शेतकर्‍यांना केले आहे.

याप्रसंगी,संगांयोचे सदस्य सुरेद्र धुमाळ,शिरूर अनंतपाळचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील { उजेडकर }, गंगाधर चव्हाण,संजय बिराजदार,प्रकाश पाटील,सुतेज माने,सुधीर लखनगावे,रमेश मोगरगे,महम्मद सय्यद,दिलीप हुलसुरे,बालाजी देशमुख आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here