27.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeमनोरंजन*पोस्ट ऑफीस उघडं आहे या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी साकारणार झोनल ऑफिसरची...

*पोस्ट ऑफीस उघडं आहे या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी साकारणार झोनल ऑफिसरची भूमिका*

पाहायला विसरू नका, नवी मालिका -‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’, गुरुवार ते शनिवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

मुंबई, १० फेब्रुवारी २०२३ : सोनी मराठी वाहिनीवरील पोस्ट ऑफीस उघडं आहे. ही मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. पारगावच्या पोस्ट ऑफीसमध्ये आता कॉम्प्युटर आल्याने धम्माल उडाली आहे. त्यातच आता मालिकेत झोनल ऑफिसर येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे झोनल ऑफिसरची भूमिका पोस्ट ऑफीस उघडं आहे.या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी साकारणार आहेत.

पोस्ट ऑफीस उघडं आहे ही मालिका पारगावातल्या पोस्ट ऑफीसमधली गोष्ट आहे. मकरंद अनासपुरे साकारत असलेले गुळस्कर आणि समीर चौघुले यांनी साकारलेले निरगुडकर यांच्यातील या मालिकेतील चढाओढ प्रेक्षकांना आवडते आहे. गुळस्कर हे नवीन पोस्ट मास्तर झाल्याने त्यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आणि अशातच आता पोस्ट ऑफीसमध्ये कॉम्प्युटर येऊन दाखल झाले आहेत. पोस्ट ऑफीसमधील कर्मचाऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाशी, कॉम्प्युटरशी जुळवून घेता येईल का, हे पाहणं आता मजेशीर असणार आहे. पोस्ट ऑफीसचं कामकाज सुरळीत चालू आहे की नाही, हे बघण्यासाठी झोनल ऑफिसर येणार आहेत. मकरंद महाजनी असे या झोनल ऑफिसरचे नाव असून ही व्यक्तिरेखा ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे..’ या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी साकारणार आहेत. झोनल ऑफिसर पोस्टात आल्यानंतर पोस्ट कर्मचाऱ्यांचा काय गोंधळ उडणार आहे, हे पाहणंही उत्कंठावर्धक ठरणार आहे.

पाहायला विसरू नका, नवी मालिका पोस्ट ऑफीस उघडं आहे., गुरुवार ते शनिवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]