गणिततज्ञ रामानुज यांच्या कार्याची प्रेरणा घेवून प्रा. सुधाकर जोशी सरांचे कार्य..
२२ डिसेंबर हा गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस जगभरात हा गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्याच्या परोड या गावी झाला. त्यांचे वडील एका कपड्याच्या व्यापाऱ्याकडे नौकरीस हो ते. रामानुजन यांचा स्वभाव अतिशय हट्टी व भावनाप्रधान होता. त्यांना त्यांची आई लाडाने चिन्नास्वामी म्हणत असतं. लहानपणापासूनच त्यांची देवावर श्रध्दा होती. रामानुजन हे शाळेत शिकत असताना अगदी पहिल्यावर्गापासून गणितात शंभर पैकी शंभर मार्क घ्यायचे. याचे सोबतच्या मित्रांना तसेच शिक्षकांनाही नवल वाटायचं.

त्यांच्या या गणितातील मार्कामुळे त्यांना
शिष्यवृत्ती ही मिळाली. रामानुजन हे इतके गणितप्रेमी होती की ते फक्त गणित विषयाचाच अभ्यास करायचे. त्यामुळे ते इतर विषयात ना पास आणि गणितात शंभर पैकी शंभर मार्क. त्यामुळे कॉलेजची शिष्यवृत्ती गेली. आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी त्यांना नौकरी करावी लागली. याबरोबरच ते विद्यार्थ्यांच्या घरी जावून शिकविणी ही देत असतं.
रामानुजन यांना गणिताविषयी इतकी माहिती, अभ्यास होता की, त्यांनी अनेक गणित विषयावर शोध निबंध लिहून अंतरराष्ट्रीय गणित तज्ञांना पाठविले परंतू त्याचे उत्तर मिळाले नाही. तरीही ते खचून न जाता आपले निबंध पाठवत राहिले. त्यातल्या हार्डी नावाच्या एका गणित तज्ञांना रामानुजन यांचे शोध निबंध आवडले. त्यांनी रामानुजन यांना गणितामध्ये शिकविण्यासाठी व त्यात आपले कार्य सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन करत शिष्यवृत्ती देवू केली. इतकेच नव्हे तर रामानुजन यांना मद्रास विद्यापीठाच्या मार्फ त केंब्रीज विद्यापिठात पाठविण्याची विनंती केली. यावेळी रामानुजन यांना घरातून विरोध होत होता. परिस्थितीही बेताचीच होती. पण रामान जन यांची शिकविण्याची जिद्द आणि गणित तज्ञ हार्डी यांच्या प्रयत्नामुळे ते केंब्रिज येथे पोहचले. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या गणितातील प्रगाढ अभ्यासातून सहकारी नव्हे तर सर्वावरच प्रभाव पाडला. अनेकांना न सोडविता आलेले समि करणे रामानुजन यांनी सोडविले. शोध निबंध सादर केले. या सगळ्या व्यापात त्यांना तब्यत साथ देत नव्हती. त्यावेळी क्षय रोगाची साथ सुरू होती. त्यामुळे भारतात परतले. इथेही ते नेहमी आजारी राहत होते. या आजारपणातही
त्यांनी गणित विषयाचे काम सुरूच ठेवले. ज्योतिष शास्त्रावरही त्यांचा विश्वास गणित आणि ज्योतिष शास्त्र यामुळे ते आकडेमोड करून ज्योतिष सांगत असत, आपल्या मृत्यू बद्दलही त्यांनी अगोदरच सांगितले होते. अशा या महान गणित तज्ञाचे अवघ्या ३३ व्या वर्षी निधन झाले. गणित विषयावर रामानुजन यांनी अनेक सिध्दांत मांडले, शोध निबंध सादर | केले, त्यांचे गणित या विषयातील कार्य अव्दि |तीय आहे. त्यांच्या या कार्याची स्मृती असावी म्हणूनच सारा देश २२ डिसेंबर हा दिवस गणित | दिवस म्हणून साजरा करत आहे.

सध्या गणित विषयाचा जवळून संबंध हा इंजिनिअरींग क्षेत्राशी येतो. सहाजिकच इंजिनिअर हा गणितामुळेच बनतात. केवळ | इंजिनिअर नव्हे तर या विषयामूळे अनेक क्षेत्रात करिअर करता येतो. आपण जर इयत्ता १२ |वीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत असाल तर इंजिनिअरींग, बीसीएस सारखे व्यावसायिक कोर्स करू शकतात. तसेच वाणिज्य आणि कला मध्येही गणित विषय महत्वाचा मानला जातो. वाणिज्य विभागातून पदवी घेवून सीए सारख्या कोर्स तर कला शाखेतून गणिताचे ज्ञान घेतल्यास स्पर्धा परिक्षांची तयारी करताना या विषयाची मदत होईल. प्रत्येकाच्या आयुष्यात किमान ७० टक्के यशस्वी करिअरसाठीचे पर्याय गणित या विषयावर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक यशस्वी माणूस आणि गणित जवळून संबंध आहे. गणितामुळे व्यवहारातील सरळता त्यातील अडी अडचणी सहज सोडविता येतात. उत्तम गणिती ज्ञानामुळे व्यवहारातील जागरूकता आणि नवनवीन
आव्हाने पेलण्यासाठीची तयारी होते. जगाम ध्ये अनेक संशोधनात्मक उदाहरणार्थ एकदा छोट्या कणापासूनते चंद्रयानापेक्षा अनेक गोष्टी आहेत. त्यात माहिती घेण्यासाठी गणिताचीच मदत होते.
आज प्रत्येक क्षेत्रात गणिताचा थेट संबंध आहे. प्रत्येक छोटा-मोठा उद्योग व्यवसाय हे गणितावर आधारीत आहे. विद्यार्थ्याचे यशस्वी करिअर घडविण्यासाठी गणित विषय हा एक सरळ मार्ग आहे. विकासात इंजिनिअर या घटकाचा महत्वाचे योगदान असते. आणि इंजिनिअर होण्यासाठी गणित हा एकमेव पर्याय आहे. आधूनिक काळात जगाच्या पाठीवर कोणत्याही छोट्या मोठ्या व्यवसाय प्रगती करण्यासाठी गणिताचा वापर होवून विकास साधता येतो. प्रगती आणि गणित हे सुत्र आहे. या निमित्त आजच्या या दिवशी थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुज यांच्या कार्याला सलाम आणि या गणित दिनाच्या सर्वाना मन:पुर्वक शुभेच्छा !
देशात लातूरने शैक्षणिक पॅटर्न निर्माण केला. या पैटर्नचा मजबूत कणा प्रा. जोशी सर मागील २५ वर्षापासून लातूर पॅटर्नची मजबूत कमान सांभाळणारे प्रा. सुधाकर जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यश आणि गणित हे सुत्र ठरले आहे. अगदी त्याच प्रमाणे जोशी सरांचा मॅथ्स क्लासचा विद्यार्थी गणित विषयात परफे क्ट असल्यामुळे यश हे निश्चित आहे. आज केवळ भारत नव्हे तर जगातील अनेक नामांकित कंपन्यामध्ये जोशी सर यांच्या मॅथ्सचे धडे घेवून यशस्वी झालेले विद्यार्थी जगभरातील नामांकित संस्थामध्ये सेवा बजावत आहेत. विद्यार्थी तयार होण्यासाठी क्लासमध्ये आल्यानंतर त्याची मानसिकता तयार करणे अत्यंत गरजेचे यासाठी मेडीटेशन करून घेणे, त्याची बौध्दीक क्षमता पाहून त्याला यशस्वी मार्गावर नेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे जोशी सर यांनी लातूर पॅटर्नमध्ये पाया भक्कम अगदी त्यामुळे आज यशस्वी प्रदेशातील देशासाठी विविध आपला गणिताचा केला आहे. हजारो विद्यार्थी ठरले आहेत. विद्यार्थी भारत राज्यामध्ये काम करणारे विद्यार्थी लातूरचे नाव रोशन करत आहेत. आज गणित दिवस या निमित्ताने जोशी सर यांच्या कार्याला सलाम करणे हे आपले कर्तव्य असणार आहे. त्यांच्या शिकवणीतून अनेक सामान्य विद्यार्थी असामान्य बनले आहेत. त्यांच्या गणिती अध्यापनाला सामाजिक बांधिलकीची किनार आहे. प्रत्येक क्षेत्रातील होतकरूंना मदत करण्यासाठी ते हात पुढे करतात. विशेषतः शिक्षण क्षेत्रातील गरजूंना पाठबळ देण्याचे काम त्यांनी केले आहे. क्लासमध्ये सातत्याने २५ टक्के विद्यार्थ्यांना फिसमध्ये सवलत देतात. गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन अशा व्यवस्था ते स्वतः पदरमोड करून करतात. एक उत्तम गणित शिक्षक म्हणून जोशी सर नेहमी काम करीत राहिले आहेत. अध्यापनाचे कार्य करत असताना कधीही पैशाला महत्व दिले नाही. त्यांच्या या कार्याला सलाम करावे त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख लोकांना व्हावी. आजच्या या गणित दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा !. . ..

सुदर्शन बाबाराव कंजे,
लातूर मो.-८९८३९३५१९९











