प्रेरणा होनराव यांचा सन्मान

0
299

भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा मीडिया पॅनलिस्ट प्रेरणा होनराव यांना “लोकमत वुमन अचिव्हर्स आँफ लातूर” या पुरस्काराने सन्मानीत…. 

लातूर,-(प्रतिनिधी)-लातूर येथील भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा मीडिया पॅनलिस्ट प्रेरणा होनराव यांना दैनिक लोकमतच्या वतीने दिला जाणारा कर्तुत्ववान महिलांचा सन्मान “वुमन अचिव्हर्स आँफ लातूर २०२१” या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

लातूर येथील हाँटेल कार्निव्हल रिसोर्ट येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यास नांदेड परिक्षेञाचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी,जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अभिनेञी शिल्पा तुळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रेरणा होनराव यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.त्यांना हा पुरस्कार सामाजिक व राजकीय क्षेञात काम करण्याची ऊर्जा पाहुन त्यांच्या कार्याची दखल म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे.याबद्दल सामाजिक,राजकीय व मित्रपरिवाराकडून त्यांचे सर्वञ अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी लातूर जिल्ह्यातील विविध क्षेञातील ४२ कर्तृृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here