माजीमंत्री आ.राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

निलंगा/प्रतिनिधी:निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी,कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्त्यांचे अधिवेशन बुधवार दि.१४ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे.माजी मंत्री आ.राम शिंदे यांचे या अधिवेशनात मार्गदर्शन होणार असल्याची माहिती आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली.
भाजपाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.त्या अनुषंगाने विधानसभा मतदारसंघ निहाय अधिवेशन व मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या तीन तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेत हे अधिवेशन होणार आहे.निलंगा येथील बँक कॉलनीत वृंदावन मंगल कार्यालयात दुपारी १२.३० वाजता हे अधिवेशन संपन्न होणार आहे.
भाजपा महायुती सरकारने राबवलेल्या जनहिताच्या योजनांचा लाभ तळागाळातील सामान्य नागरिकांना मिळत आहे.आता शासनाने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.त्यामुळे राज्यात महिला वर्गात समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे.निलंगा विधानसभा मतदारसंघात या योजनेतून सर्वाधिक नोंदणी झालेली आहे.
माजी मंत्री आ. राम शिंदे व आ. संभाजी पाटील निलंगेकर या अधिवेशनात पुढील रणनीतीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.असे आवाहन निलंगा तालुकाध्यक्ष कुमुद लोभे, शिरुर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील व देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे यांनी केले आहे.