39 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeराजकीय*भाजपाच्या नेतृत्वात रेणापूरचा चौफेर विकास*

*भाजपाच्या नेतृत्वात रेणापूरचा चौफेर विकास*

साडे सतरा कोटीच्या विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी आ. रमेशअप्पा कराड

         रेणापूर :- रेणापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून रेणापूर शहराचा चौफेर विकास केला येत्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा भाजपाला साथ द्या पाच वर्षात एकही काम शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली.

            भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून रेणापूर नगरपंचायत अंतर्गत भाजपचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे आणि माजी नगराध्यक्षा आरती राठोड यांच्या कार्यकाळात रेणापूर शहरासाठी मंजूर झालेल्या 17 कोटी 71 लक्ष रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, अग्निशमन इमारतीचे उद्घाटन, विविध प्रभागातील सिमेंट रस्ता नाली बांधकामाचे तसेच समाजमंदिर सभागृहाचे लोकार्पण आणि भूमिपूजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या शुभहस्ते रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमातून बोलताना आ. कराड यांनी ग्वाही दिली. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, प्रदेशाचे अमोल पाटील, लातूर ग्रामीण अध्यक्ष अनिल भिसे, तालुका अध्यक्ष अ‍ॅड. दशरथ सरवदे, ओबीसी मोर्चाचे मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ. बाबासाहेब घुले, माजी उपसभापती अनंत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर, वसंत करमुडे, महेंद्र गोडभरले, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद दरेकर, सुकेश भंडारे, श्रीकृष्ण पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

        यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की गेल्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत जनतेनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकून सत्ता दिली. पाच वर्षाच्या कार्यकाळात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यानंतरच रेणापूर शहरात कोट्यावधी रुपयाची विविध विकासाची कामे होत आहेत जनतेनी टाकलेला विश्वास अभिषेक आकनगिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकास कामाच्या माध्यमातून सार्थक केला असल्याचे बोलून दाखविले.

          या भागात काँग्रेसचा आमदार पालकमंत्री असताना त्यांनी कुठल्या विकास कामाला निधी दिला असा प्रश्न उपस्थित करून गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीने केवळ वसुलीचेच काम केले असल्याचे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की राज्यात पुन्हा भाजपा सेना युतीचे सरकार आले आहे. सर्वसामान्य गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करीत आहे. राज्यात नवे सरकार सत्तेवर येताच रेणापूर शहराला पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पुन्हा विकासाची गंगा सुरू झाली असल्याचे सांगितले.

         गेल्या अडीच वर्षातील विकासाचा राहिलेला बॅकलाँग भरून काढण्यासाठी आणि उर्वरित विकास कामांना गती देण्यासाठी येत्या काळात होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत नागरिकांनी भाजपाला साथ द्यावी पाच वर्षात विकासाचे एकही काम शिल्लक राहणार नाही असे अभिवचन यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड यांनी दिले.

       भाजपाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दशरथ सरवदे यांनी आमदार रमेशअप्पा कराड यांच्या माध्यमातून रेणापूर शहराबरोबरच तालुक्यातील गावागावात वाडी वस्तीत विकासाचा मोठा निधी प्राप्त झाला असल्याचे बोलून दाखवले तर आजपर्यंत केलेल्या विविध विकास कामाची माहिती माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी आपल्या भाषणातून दिली.

         या कार्यक्रमात सम्राट अशोक बौद्ध विहार बांधकामासाठी एक कोटी, नासरजंग कब्रस्तान संरक्षण भिंतीकरिता 25 लक्ष रुपये, संत रोहिदास महाराज मंदिर सभागृह बांधकामासाठी 15 लक्ष मंजूर केल्याबद्दल आणि दहा लक्ष रुपये खर्चाचे श्रीराम मंदिर सभागृह आणि अमृतेश्वर महादेव मंदिर सभागृह, कुडके गल्लीत मातंग समाज सभागृहासाठी बारा लक्ष रुपयाचे समाजमंदिर बांधकाम केल्याबद्दल त्या त्या भागातील नागरिकांच्या वतीने आ. रमेशअप्पा कराड यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी दत्ता सरवदे यांनी आभार मानले.

       प्रारंभी सर्व मान्यवरांचा माजी नगरसेवक आणि भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा आरती राठोड, विजय चव्हाण, श्रीमंत नागरगोजे, रमाकांत फुलारी, शीला आचार्य, शेख अजीम, उज्वल कांबळे, श्रीकृष्ण मोटेगावकर, अंतराम चव्हाण, लखन आवळे, महेश गाडे, रमा चव्हाण, राजू आलापुरे, अच्युत कातळे, हनुमंत भालेराव, गणेश चव्हाण, राजू आतार, गोविंद राजे, रमेश वरवटे, उत्तम घोडके, लिबराज गायकवाड, बालाजी गायकवाड, बाबुराव जाधव, विशंभर खणगे, हनुमंत कातळे, विलास खांणगे, शिवाजी सलगर, नंदकुमार मोटेगावकर, सुभाष राठोड, धम्मानंद घोडके, विशाल कांबळे, शफी शेख, रफिक शिकलकर, सलीम शेख, मकसूद शेख, गणेश माळेगावकर, तुकाराम सातपुते, सोपान सातपुते, सोमनाथ सातपुते, शरद चक्रे, मुरलीधर चक्रे, गोविंद कुडके, महादेव राठोड, पिंटू वैष्णव, बालाजी वैष्णव, सचिन लोकरे, रोहित खुमसे, योगेश राठोड, नागेश बस्तापुरे, खुदूस शेख, जाहीरुद्दीन बावस्कर, भानुदास कुडके, नरसिंग कुडके, पप्पू कुडके, प्रल्हाद बंडे, सलीम बावचकर यांच्यासह प्रत्येक प्रभागातील सर्व स्तरातील नागरिक भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]