24.1 C
Pune
Saturday, February 7, 2026
Homeराजकीयभाजपाच्या प्रचारार्थ रेणापूरात अभूतपूर्व प्रचार सभा

भाजपाच्या प्रचारार्थ रेणापूरात अभूतपूर्व प्रचार सभा

भाजपाला साथ द्या, रेणापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

महसूलमंत्री बावनकुळेभाजपाच्या प्रचाराची रेणापूरात अभूतपूर्व प्रचार सभा; विजयावर शिक्कामोर्तब

लातूर दि. १७ – महायुती शासनाने रेणापूरच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी दिला. येणाऱ्या २०४७ पर्यंत रेणापूरकरांच्या गरजा लक्षात ठेवून आपणास विकास करायचा आहे. निश्चितपणे रेणापूर विकासाचे मॉडेल तयार करून त्यासाठी विकसीत रेणापूरचा संकल्प करा भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षासह सर्व प्रभागातील उमेदवारांना बहुमतानी विजयी करून आशीर्वाद द्या रेणापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेणापूर येथील प्रचार सभेत दिली.

रेणापूर नगरपंचायत निवडणूकीतील भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभाताई आकनगिरे आणि १७ नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ रेणापूर येथील बाजार मैदानावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी जाहीर सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड हे होते. तर याप्रसंगी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, गणेशदादा हाके, भाजपाचे संघटन मंत्री संजय कौडगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश कराड, नाथसिंह देशमुख, विक्रमकाका शिंदे, भागवत सोट, नवनाथ भोसले, महेंद्र गोडभरले, दशरथ सरवदे, अनिल भिसे, सतीश आंबेकर, श्रीनिवास अकनगिरे, सुरज शिंदे, शरद दरेकर, विजय काळे रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्यासह भाजपचे सर्व उमेदवार, प्रमुख पदाधिकारी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या जाहीर सभेला बाजार मैदान खचाखच भरले होते. संपूर्ण मैदान भाजपामय झाले होते त्यात महिलांची संख्या प्रचंड होती. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, बावनकुळे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, रमेश आप्पा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, यासह विविध गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रसरकारच्या ५५ योजना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यसरकारच्या ४८ योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीचा निधी आणि आपले कर्तव्यदक्ष आमदार रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून मंत्रालयातून रेणापूरच्या विकासासाठी भरघोस निधी आणायचा आहे असे सांगून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, रेणापूरच्या विकासाला गती देण्यासाठी भाजपाचा वचननामा पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या डबल इंजिनसोबत रेणापूरला विकासाचं तिसर इंजिन जोडा असे आव्हान केले. ग्रामीण भागात शेत रस्त्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा असून मुख्यमंत्री बळीराजा पाणंदमुक्ती रस्ता राज्य शासनाने सुरू केली असून या योजनेअंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. येणाऱ्या पाच वर्षात रेणापूरसह कुठलाही रस्ता शिल्लक राहणार नाही असे जाहीर करून ऑक्टोबर २०२४ पूर्वी जेवढी घरे झाली आहेत त्यांना सातबारा मालकी देवू तसेच सरकारी जागेवर जे लोक राहत असतील त्यांना कबाले देण्याचा निर्णय घेतला असून यामुळे एकही रुपया नं घेता काळेवाडी, संजयनगर, नेहरूनगर, सेवादास नगर यासह रेणापूर येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखविले.

शंभर वर्षानंतर प्रत्येक घराचा सर्वे करण्याचा निर्णय महायुती शासनाने घेतला असून एका घरासाठी रुपये ४ हजार खर्च येतो परंतु आम्ही एकही रुपया न घेता रेणापूर शहरातील प्रत्येक घराचे सर्वे करून प्रत्येक घराची सनद देणार आहोत अशी माहिती देऊन रेणापूर विकासाच्या गाडीत विकासाचं पेट्रोल टाकाण्यास आम्ही आहोत. या गाडीची चावी शोभाताई आकनगिरे यांच्याकडे द्या आणि जेवढा निधी पाहिजे तेवढा निधी आम्ही देवू असे अभिवचन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

लाडकी बहिण योजना आम्ही केवळ चालू ठेवणार नाही तर ती अधिक बळकट करणार आहोत असे सांगून राज्य शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. रमेशआप्पा कराड कर्तव्यदक्ष आमदार आहेत रेणापूरच्या विकासासाठी त्यांनी कोट्यावधीचा निधी आणला असे सांगून काँग्रेस पक्षाला कोणी वाली राहिला नाही, कुणाचा पायपोस कुणाला नाही, काँग्रेस पार्टी दिवाळखोरीकडे चाललेली आहे. त्यामुळे अनेकजण भाजपात प्रवेश करत आहेत. त्रिंबक भिसे यांनी काँग्रेस पार्टी सोडून भाजपात प्रवेश केला हा त्यांचा निर्णय योग्य आहे. तेंव्हा विकसित संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी विकासाच्या बाजूने राहून भाजपाला साथ द्यावी असे आवाहन केले. यावेळी बोलताना आ. रमेशअप्‍पा कराड म्हणाले की, रेणापूरचा सर्वांगिण विकास करण्याचे काम आम्ही केले. काँग्रेस पक्षाने जाती जातीत मतभेद निर्माण करण्याचे काम केले. मागील ५ वर्षाच्या काळात कॉग्रेसचे आमदार कुठे होते? असा सवाल करुन आज ते रेणापूरात गल्लोगल्ली फिरत आहेत ही निवडणूक प्रतिष्ठेसाठी नव्हे तर रेणापूरकरांच्या स्वाभिमानाची, विकासाची निवडणूक आहे. अभिषेक आकनगिरे यांच्या माध्यमातून रेणापूरचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आम्ही केले. विकासाच्या कामात कसलाही मतभेद केला नाही. केलेल्या विकास कामाच्या आधारावर आम्ही आशीर्वाद मागतोय, विकासाची गती कायम ठेवण्यासाठी कमळ चिन्हा समोरील बटण दाबून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभाताई आकनगिरे आणि सर्व १७ नगरसेवकांना विक्रमी मतानी विजयी करावे असे आवाहन केले.

लातूर ग्रामीणमध्ये बलाढ्या नेत्याला पाडून रमेशअप्पांनी इतिहास निर्माण केला असे सांगून माजी मंत्री आ. संजय बनसोडे यावेळी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विकासाचं रोडमॅप आहे. आ. रमेशअप्पा कराड हे सातत्याने मंत्रालयात रेणापूरच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी धडपडत असतात. कोणताही जाती धर्माचा विचार न करता एकसंघपणे रेणापूरकरांनी विकासासोबत राहावे. सर्वांगीण हितासाठी रेणापूरच्या प्रगतीसाठी भाजपासोबत राहून रमेशअप्पा कराड यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन बनसोडे यांनी केले. प्रचारसभा नव्हे तर विजयी सभा म्हणावे लागेल असे सांगून भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले की सभेतील गर्दी पाहून आ. रमेशअप्पा कराड यांच्या कामाची पावती मिळते, रमेश आप्पांनी रेणापूर बरोबरच संपूर्ण लातूर ग्रामीण मतदार संघात प्रचंड मोठा विकासात्मक बदल घडून आणला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. रमेशआप्पांना साथ द्या भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आव्हान त्यांनी केले.

माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे यांनी काँग्रेसमध्ये आता विकासवादी आणि आश्वासक चेहरा राहिला नाही. भाजपकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘यांचा आश्वासक चेहरा असल्यामुळेच आ. रमेशअप्पा कराड हे विकास निधी खेचून आणण्याचे काम करत असल्यामुळे आपण भाजपात प्रवेश केला. रेणापूर नगर पंचायतीच्या निवडणूकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांच्यासह सर्व १७ उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश कराड यांनी धडाकेबाज भाषण करून काँग्रेसच्या कारभारावर टीका करत भाजपाच्या माध्यमातून झालेल्या कामाची माहिती दिली रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून नगरपंचायत च्या कामाची माहिती देऊन या पुढील काळात काम करण्याची संधी द्यावी असे आव्हान केले. यावेळी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष स्वाती उमेश सोमाणी, उमेश किशोर सोमाणी, आकाश पाटील, भानुदास जाधव, कृष्णा राठोड व इतर अनेकांनी भाजपात प्रवेश केला. प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले. या जाहीर प्रचार सभेस भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह रेणापूर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील हजारो महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]