22.9 C
Pune
Thursday, October 30, 2025
Homeसामाजिक*मराठा समन्वय परिषदेच्या कर्नाटक प्रदेश अध्यक्षपदी प्रा.मीनाक्षी पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी प्रा.अनिता...

*मराठा समन्वय परिषदेच्या कर्नाटक प्रदेश अध्यक्षपदी प्रा.मीनाक्षी पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी प्रा.अनिता काळे, महासचिव पदी प्रवीण मोरे यांची नियुक्ती*

नवी दिल्री: दि.29 आॅगस्ट 2022 -: मराठा समन्वय परिषदेच्या राष्ट्रीय कार्यसमितीने नुकत्याच नियुक्त्या जाहिर केल्यात.

राष्ट्रीय कार्यसमितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेशपाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राचार्या शारदा जाधव, राष्ट्रीय महासचिव सीए विजयकुमार शिंदे यांनी क्रमशः महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्याध्यक्षपदी प्रा.अनिता काळे,प्रदेश महासचिवपदी भाऊसाहेब प्रवीण मोरे आणि कर्नाटक प्रदेश अध्यक्षपदी प्रा. मीनाक्षी पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन स्वराज्य ईतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यात, बाल साहित्य निर्मितीत, योगशास्र,व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन,नि:शुल्क व साधे विवाह विधी प्रचारप्रसार, युवतींमध्ये सक्षम ताराराणी प्रशिक्षण उपक्रम , युवकांना रचनात्मक कामात जोडणे व महिला आणि शेतकरी सक्षमीकरणासाठी शिवमती प्रा. मीनाक्षी पाटील, प्रा.अनिता काळे, भाऊसाहेब मोरे यांनी गत दोन दशकात मोलाचे योगदान दिले आहे.

मराठा समन्वय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील यांनी वरील शिवसेवार्थी मान्यवरांच्या नियुक्तीची घोषणा करुन नियुक्तीपत्र प्रदान केले.

अनिता काळे या जिल्हा परिषदेच्या शिक्षिका असून, त्या सामाजिक क्षेत्रात गत दोन दशकापेक्षा जास्त काळापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. भाऊसाहेब मोरे हे ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात गत दोन दशकापासून योगदान देत आहेत. प्रा.मीनाक्षी पाटील गत 25 वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक परिसरात शिवचरित्र प्रचारप्रसाराचे काम पार पाडत महिला व बेरोजगार युवकांच्या सक्षमीकरणावर काम करीत आहेत. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्या बांधणीत प्रा. मीनाक्षी पाटील, श्रीमती अनिता काळे आणि शिवश्री भाऊसाहेब मोरे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. वरील सदस्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्यकारणीवर काम करण्याची संधी देण्यात आली असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील यांनी म्हंटले आहे.

मराठा समन्वय परिषदेच्या माध्यमातून सामाजिक योगदान देऊन, महिला, शेतकरी , युवक व युवतींच्या प्रश्‍नांसाठी विशेष कार्य करणार असल्याची भावना पाटील , काळे आणि मोरे यांनी व्यक्त केली. या नियुक्तीबद्दल मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, प्रयास ग्रुप, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील जाणकारांनी, व शिक्षक वर्गाने प्रा.पाटील, प्रा.काळे आणि शिवश्री मोरे यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]