19.6 C
Pune
Friday, October 31, 2025
Homeशैक्षणिक*महात्मा बसवेश्वरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळावा उत्साहात साजरा*

*महात्मा बसवेश्वरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळावा उत्साहात साजरा*

लातूर, ता. ३१ ( प्रतिनिधी) : दिवाळी सण उत्सवाचा, आनंदाचा, प्रकाशाचा, कुटुंबीयांसाठी तसाच आप्तेष्टांना भेटण्याचा दरवर्षी या सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम राबविले जातात. तर अलिकडे गेट-टुगेदरचे आयोजन देखील मोठ्या प्रमाणावर गावोगावी माजी विद्यार्थ्यांकडून केले जात आहे. त्यापैकीच एक असलेले लातूरच्या श्री महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील १९९३-९४ बँचचे माजी विद्यार्थी २८ वर्षांनी एकत्र जमले आणि वर्गमित्राची बसवेश्वर कॉलेज बॅच या नावाने व्हाट्सअप ग्रुप बनविला. या ग्रुपवरच स्नेह मेळावा घेण्याचे नियोजन आखण्यात आले.

लातूरच्या मातोश्री वृद्धाश्रमात रविवारी (ता. ३०) रोजी स्नेहबंध मेळावा आयोजित करण्यात आला. या गेट-टुगेदरच्या कार्यक्रमासाठी बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, सेवानिवृत्त माजी उपप्राचार्य भैय्यासाहेब नारंगे, प्रा. प्रल्हाद ढाके, पी. टी. पवार, डॉ. एम. एस. दडगे, प्रा. डॉ. श्रद्धा अवस्थी, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पीएच. डी. प्राप्त झालेल्या माजी विद्यार्थी प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. संजय शिंदे, डॉ. हनुमंत माने, डॉ. माच्छिंद्र खंडागळे, डॉ. दशरथ रसाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व गुरुजनांचा माजी विद्यार्थ्यांकडून यथोचित सत्कार करण्यात आला. गुरुजनांनी यावेळी मार्गदर्शन करून माजी विद्यार्थ्यांप्रती मनोगतातून भावना व्यक्त केल्या. धनाजी तोडकर, हनुमान रांदड, अंगद पवळे, सतीश गायकवाड, कविता खणगे, अनिता यादव, दिनेश पाटील, माधव शिंदे, मच्छिंद्र खंडागळे आदींनी पुढाकार घेऊन हा सोहळा यशस्वी केला. लक्ष्मण बदिमे, शिवाजी कोराटे, नागेश सोनटक्के, बालाजी इतबारे, सुधीर कोरे, किरण भुसे, विवेकानंद थोरमोटे, उत्तरेश्वर चव्हाण, भीमाशंकर खोबरे, महादेव भालेराव, रमेश चव्हाण, दामोदर मुळे, धनंजय नांदगावकर, सतीश खांडके, तुकाराम तरगुडे, गुलाब काळे, राजकुमार केंचे, माधव पुंडकरे, यादव कसपटे, जलील शेख, अनिल कुलकर्णी, बालाजी बिरादार, रोहिणी स्वामी, सुजाता पोतदार, कमल पालीवाल, सुनिता सूर्यवंशी, अनुराधा स्वामी, सिंधू चौधरी, ज्योती वाळके, विजया पांचाळ, सीमा कुरेशी, मनीषा हरडगे आदींनी आपला स्वतःचा परिचय, जुन्या आठवणींना उजाळा देऊन भावस्पर्शी मनोगत व्यक्त करून निरोप घेतला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनाजी तोडकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगद पवळे आणि देवदत्त मुंढे तर आभार शिरीष पाटील यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]