*महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे वस्त्रोद्योग भूषण पुरस्कार जाहीर*

0
619

इचलकरंजी ; ( प्रतिनिधी ) –महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई व देवांग समाज इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने वस्त्रोद्योग व्यवसायात नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करून तसेच अनेक लोकांना रोजगार देऊन उल्लेखनीय योगदान दिलेबद्दल कोष्टी समाजातील विविध संस्था व मान्यवर व्यक्तींना वस्त्रोद्योग भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे वितरण रविवार दि.७ ऑगस्ट रोजी आमदार प्रकाश आवाडे ,माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे.

महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई व देवांग समाज यांनी संयुक्तपणे जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये
संस्था गटामध्ये विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघ- विटा, व्यक्ती गटामध्ये सर्वश्री सुकुमार महाजन ( रेंदाळ), विठ्ठल भुजबळ (वडवणी), राहुल लोले ( पेठवडगांव) , शंकर निवळे (कुंडल), मनोज सगम (येवला), सचिन करंजकर (येवला), यांचा समावेश आहे.या पुरस्काराचे वितरण आमदार प्रकाश आवाडे, माजी वस्त्रोद्योग राज्य मंत्री व विद्यमान आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते तसेच कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालकमहेश चोथे , अखिल भारतीय देवांग समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण वरोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here