25.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeशैक्षणिकमहाराष्ट्र विद्यालयाची गगनभरारी

महाराष्ट्र विद्यालयाची गगनभरारी

महाराष्ट्र महाविद्यालयास ” महाराष्ट्र राज्य ” शासनाचा पुरस्कार..

अभिनंदनाचा वर्षाव..

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-

निलंगा येथील महाराष्ट्र महावाद्यालयास राज्य महिती तंञज्ञान व सहायता केंद्र आणि उच्च व तंञशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणार्‍या करिअर कट्टा हा उपक्रम आँनलाईनरित्या राबविला जात आहे.या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जागरूकता वाढावी म्हणून राज्यस्तरीय विभागीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात येथील महाराष्ट्र महाविद्यालयाची नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून निवड झाली आहे.
राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र महाविद्यालयातील करिअर कट्टा विभागाचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर,संस्थेचे सचिव बब्रुवान सरतापे,महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.माधव कोलपुके,उपप्राचार्य डाॅ.चंद्रकुमार कदम आदींनी कौतुक केले.करिअर कट्टा उपक्रमाचे महाविद्यालयीन समन्वयक म्हणून डाॅ.सुभाष बेंजलवार,आयएएस आपल्या भेटीला या उपक्रमाचे समन्वयक डाॅ.भास्कर गायकवाड,उद्योजक आपल्या भेटीला उपक्रमाचे समन्वयक डाॅ.अरूण धालगडे,करिअर कट्टा उपक्रमाचे ब्रॅण्ड अँम्बेसिडर चैतन्य किट्टेकर,पुंडलिक शिंदे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]