मांजरा नदीला महापूर

0
340

सततच्या पावसामुळे मांजरा नदी व सौळ नदीला पुरस्थिती ; पूरात अडकलेला तरूण शिवाजी कुद्रे याला प्रशासनाने काढले सुखरूप बाहेर…

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-अलिकडील कालावधीत सततच्या पावसामुळे उजेड येथील मांजरा नदी व मसलगा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मसलगा जवळील सौळ नदीला व उजेडच्या मांजरा नदीला पूरपरिस्थिती येवून पुलावरून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी पुलावरून पाणी विसर्ग होत असल्याने वाहतूक राञी पासून ठप्प झाली आहे.त्यातच शिवाजी कुद्रे रहिवाशी देगलूर हा सालगडी पुरामुळे शेतात अडकल्याने त्याला आपत्ती व्यवस्थापन टिमने सुखरूप बाहेर काढले.माञ,मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.

मागीत सततच्या पडत असलेल्या पावसामुळे व मांजरा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळे मांजरा नदीला पूरस्थिती आली आहे.मसलगा व वांजरखेडा शिवारात सालगडी म्हणून काम करत असलेला शिवाजी कुद्रे हा तरुण रहिवाशी देगलूर हा शेतातच अडकला होता.काल चोहो बाजूंनी पाण्यात घेरल्याने तो भेदरलेल्या अवस्थेत होता याची माहिती संगांयोचे सदस्य सुरेंद्र धुमाळ तसेच मसलगा गावचे सरपंच रमेश पाटील यांनी सदरील घटनेची माहिती प्रशासनाला दिली त्यावरून निलंग्याचे तहसिलदार गणेश जाधव,मंडळ अधिकारी आर.व्ही.देशमुख,तलाठी प्रविण कस्तूरे , तलाठी अर्चना चव्हाण,पानचिंचोली पोलीस ठाण्याचे बिट अमलदार सुनिल पाटील हे सकाळी सात पासून आपत्ती व्यवस्थापन टिमला पाचारण केले व शिवाजी कुद्रे याला सहीसलामत बाहेर काढले सदरील तरूणाला बाहेर काडेपर्यंत तहसिलदार गणेश जाधव व त्यांची टिम बारकाईने लक्ष ठेवून होती.

दरम्यान,मांजरा व सौळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे निटूरहुन लातूरला जाणारी वाहतूक तसेच निटूरहून शिरूरअनंतपाळ कथे जाणारी वाहतूक कालपासून ठप्प असल्यामुळे या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.तहसिलदार गणेश जाधव हे भेट देत असून कर्मचार्‍यांना मार्गदर्शक सूचना ही देण्यात आल्या आहेत.

उजेड येथील मांजरा नदीकाठचे गाव असल्याने गावातील घरांमध्ये पाणी गेल्याचे समजते.तसेच,मांजरा नदीकाठच्या शेतकर्‍याच्या उभ्या पीकांमध्ये पाणी जाऊन अतोनात नुकसान झाले आहे.याकडे,प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकरी करित आहेत.तसेच,मसलगा सौळ नदीकाठच्या शेतकर्‍याच्या जमिनी पाणी थांबल्याने अतोनात नुकसान झाले आहे,प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकरी करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here