22.8 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeताज्या बातम्या*माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍याकडून एस.टी.अपघातातील जखमींची आस्‍थेवाईकपणे चौकशी*

*माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍याकडून एस.टी.अपघातातील जखमींची आस्‍थेवाईकपणे चौकशी*

योग्‍य उपचार देणेबाबत प्रशासनास दिल्‍या सूचना

लातूर प्रतिनिधी:– निलंगा आगाराच्‍या निलंगा-पुणे या एस.टी.ला आज सकाळी मुरूड येथे अपघात झालेला आहे. या अपघाताचे वृत्‍त कळताच माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी तात्‍काळ अपघाताच्‍या घटनेची माहिती घेतली. त्‍याच बरोबर अपघातातील जखमींवर उपचार सुरू असलेल्‍या विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्‍या सर्वोउपचार रूग्‍णालयात जावून त्‍या जखमींची भेट घेवून त्‍यांची आस्‍थावाईकपणे चौकशी केली. या जखमींसोबत चर्चा करून प्रकृतीची विचारपूस केली. अपघातातील जखमींवर योग्‍य उपचार देणेबाबत वैदयकीय अधिक्षक डॉ.संतोषकुमार डोपे यांना आ.निलंगेकर यांनी विशेष सूचना दिल्‍या.

निलंगा आगाराची निलंगा-पुणे या एस.टी.बसला आज सकाळी मुरूड येथे अपघात झालेला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र २२ प्रवासीं जखमी झालेले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी तात्‍काळ संबंधीत यंत्रणेशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली. अपघातात जखमीं झालेल्‍या रूग्‍णांवर तात्‍काळ उपचार करण्‍याबाबत सूचना देवून आवश्‍यक असल्‍यास जखमींना लातूर येथील सर्वोउपचार रूग्‍णालयात दाखल करण्‍याबाबत सांगितले. या अपघातात जखमीं झालेल्‍या २२ प्रवाशांवर मुरूड येथे प्रथम उपचार करून त्‍या सर्वांना लातूर येथील वैदयकीय महाविदयालयाच्‍या सर्वोउपचार रूग्‍णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलेले आहे.

माजीमंत्री आ.निलंगेकर यांनी वैदयकीय महाविदयालयाच्‍या सर्वोउपचार रूग्‍णालयात जावून जखमींची भेट घेत त्‍यांची आस्‍थावाईकपणे चौकशी केली. या जखमींवर योग्‍य उपचार होत असल्‍याची माहिती घेवून या जखमीं रूग्‍णांना लवकरच स्थिरता लाभेल अश्‍या सदिच्‍छा व्‍यक्‍ती केल्‍या. जखमीं रूग्‍णांसह त्‍यांच्‍या नातेवाईकासोबत माजीमंत्री आ.निलंगेकर यांनी चर्चा करून उपचारात कोणतीही हयगय होणार नाही असा विश्‍वासू देवून या जखमींना शासकीय मदत मिळवून देण्‍यासाठी आपण पाठपुरावा करू अशी ग्‍वाही माजीमंत्री आ.निलंगेकर यांनी दिली.

त्‍याच बरोबर जखमींना योग्‍य उपचार देणेबाबत वैदयकीय अधिक्षक डॉ.संतोषकुमार डोपे यांना सूचना देवून आवश्‍यक असणा-या रूग्‍णांना पुढील उपचारासाठी इतरत्र हलविण्‍याची गरज पडल्‍यास त्‍याबाबतही यंत्रणा सतर्क ठेवावी अशी सूचना दिली. यावेळी वैदयकीय अधिकारी यांच्‍यासह जिल्‍हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, दगडु सोळुंके, जिल्‍हा उपाध्‍यक्ष शेषेराव ममाळे, भाजयुमोचे जिल्‍हा सरचिटणीस तानाजी बिरादार आदी. उपस्थित होते.

आधी उपचार मग सहया करा

शासकीय वैदयकीय महाविदयालयाची तपासणी चालु असल्‍याने वैदयकीय अधिष्‍ठता डॉ.समीर जोशी त्‍या कामात मग्‍न असल्‍याची माहिती माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांना मिळाली. सदर माहिती मिळताच वैदयकीय अधिष्‍ठता यांची झडती घेत रूग्‍णालयात रूग्‍ण सेवेला प्राधान्‍य गरजेचे असल्‍याचे सांगून अपघात झाला असुन यामध्‍ये अनेकजण जखमीं झालेले आहेत. मात्र याबाबत कोणतीही दखल न घेता वैदयकीय अधिष्‍ठता डॉ.जोशी तपासणीमध्‍ये कसे काय असा प्रश्‍न उपस्थित करून आधी उपचार करा मग तपासणीच्‍या सहया करा अशी झडती घेतली. वैदयकीय क्षेत्रात काम करत असताना रूग्‍ण सेवा अतिशय महत्‍वाची असते. याकडे दुर्लक्ष होणे योग्‍य नसल्‍याचे सांगून पुढील काळात यासारखे प्रकार होवू नयेत. याची दक्षता घेण्‍यात यावी अशी अपेक्षा माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]